Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

41 वर्षानंतर भरला जिल्हा परिषद शाळा मुलांची मल्टीपर्पज चा दहावीचा वर्ग

गुरुजनाचा सत्कार करून गेट टू गेदर संपन

बीड प्रतिनिधी - जिल्हा परिषद शाळा मुलांची मल्टीपर्पस ही त्या काळातली प्रतिष्ठा प्राप्त शाळा होती जवळपास 40 वर्ष ही शाळा कार्यरत होती कालांतराने ख

राज्यात आता हिंदुत्ववादी सरकार : राणे
आईसाठी चिमुकल्याची धडपड व्हिडिओ व्हायरल
प्रभाग 11 मधील पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा मनपात ठिय्या आंदोलन – अविनाश घुले

बीड प्रतिनिधी – जिल्हा परिषद शाळा मुलांची मल्टीपर्पस ही त्या काळातली प्रतिष्ठा प्राप्त शाळा होती जवळपास 40 वर्ष ही शाळा कार्यरत होती कालांतराने खाजगी शाळांच्या स्पर्धेत ही शाळा अशोक नगर बीड येथे चालू आहे
1982 च्या दहावीच्या बॅचमधील एक विद्यार्थी राजीव कुवतवाडा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वर्ष मेहनत करून जवळपास सर्व वर्गातील विद्यार्थी मित्रांना एकत्रित केले त्यानंतर गेट-टु गेदर करण्याचे ठरले या कार्यक्रमात गुरु जनाचा सत्कार करण्याचे ठरले त्यानुसार 11 जून रोजी हॉटेल विघ्नहर्ता बीड येथे हा छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात झाली नंतर गुरुजन आदरणीय श्री पारिख सर,एल डी देशमुख, सर रेवन वार सर, यांचा सत्कार करण्यात आला तसेच सर्वगवासी झालेले आय सी वाघमारे सर, विठ्ठल गिराम सर ,वांगीकर सर ,एस व्ही देशमुख सर ,एस एन मस्के सर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व तसेच स्वर्गवासी झालेले विद्यार्थी मित्र सुनील शिरसाठ ,गणेश गायकवाड ,प्रभाकर गोले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यानंतर सर्व उपस्थित मित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला व गुरुजनांनी पुन्हा सर्व विद्यार्थी मित्रांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात उपस्थित असलेले दत्तात्रेय पत्की, आबासाहेब मोराळे,अझहर फारोकी ,पारवे कुमावत ,महादेव काळे ,दीपक बनसोडे ,रशीद पठाण ,सुदीप शोत्रे ,सुदीप राजपूत ,मनोज बुंदले ,शंकर विटकर ,शेख आयुब ,मुंडे दिनकर ,जालिंदर मुळे ,संजय पवार ,मारुती विटकर ,महेश मालखरे सह सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे  कार्यक्रमाच्या समारोप राष्ट्रगीत म्हणून करण्यात आला.प्रास्ताविक आबासाहेब मोराळे यांनी केले सूत्रसंचालन दत्तात्रय पत्की यांनी केले  तर आभार प्रदर्शन रशीद पठाण यांनी केले.

COMMENTS