पारनेरमध्ये त्रिशंकू स्थिती, राष्ट्रवादी व सेनेला समान संधी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पारनेरमध्ये त्रिशंकू स्थिती, राष्ट्रवादी व सेनेला समान संधी

कान्हूर पठार/प्रतिनिधी : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगर पंचायत समितीच्या एकूण 17 जागांचे निकाल लागले असून त्रिशंकू स्थिती झाली आहे. येथे कोणत्याही एक

आईचे मरणोपरांत विधी टाळत विधायक कार्यास देणगी
श्रीरामपुरात बिबट्याचा तरुणांवर हल्ला ….
आता कट्टा…अडीच वर्षांचे उट्टे फेडणार?

कान्हूर पठार/प्रतिनिधी : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगर पंचायत समितीच्या एकूण 17 जागांचे निकाल लागले असून त्रिशंकू स्थिती झाली आहे. येथे कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेले नाही. 17 जागांपैकी आ. निलेश लंकेच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक 7 जागा मिळाल्या आहेत. तर माजी आमदार विजय औटी यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 6 जागा तर भाजपला एक जागा मिळाली आहे. दोन प्रभागात शहर विकास आघाडीचे तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आला आहेत.
पारनेर नगर पंचायतीच्या 17 जागा असल्याने सत्तेसाठी 9 जागा जिंकणे गरजेचे होते. पण े हा जादुई आकडा राष्ट्रवादी वा शिवसेनेला गाठता आला नाही. त्यामुळे शहर विकास आघाडीने दोन जागा जिंकल्याने सत्तेची चावी त्यांच्या हातात गेली आहे. राष्ट्रवादीला सत्ता मिळवणारच असा दावा या निकालानंतर आ. लंके यांनी केला असल्याने त्यांच्याकडून शहर विकास आघाडीला समवेत घेतले जाते की, एक अपक्ष व एक भाजपचे विजयी उमेदवार असल्याने त्या दोघांना गळाला लावले जाते, हे पाहणे उत्सुकतेचे होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनाही सत्तेसाठीचे प्रयत्न करणार आहेत. मात्र, राष्ट्रवादीला सत्तेसाठी 2जणांची तर शिवसेनेला 3 जणांची गरज आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष सत्ता स्थापनेदरम्यान काय घडामोडी घडतात, हे पाहणे उत्सुकतेचे होणार आहे. पारनेर नगर पंचायतीमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतीलच दोन घटक पक्षांमध्ये प्रमुख लढत रंगली. या आघाडीने काँग्रेसला समवेत घेतले नाही तर भाजपही स्वतंत्र लढले व काहीजण शहर विकास आघाडीकडून लढले. अशा संमिश्र लढतीने पारनेर नगर पंचायतीचा निकाल त्रिशंकू झाला असून, आता सत्तेसाठी घोडेबाजार रंगणार आहे. या निवडणुकीतील धक्कादायक निकाल म्हणजे शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांच्या पत्नी जयश्री विजय औटी यांना पराभवाचा धक्का बसला आहे. या प्रभागात राष्ट्रवादीच्या हिमानी नगरे या निवडून आल्या आहेत. जयश्री औटी यांचा केवळ 13 मतांनी पराभव झाला आहे. त्यांना 362 तर हिमानी नगरे यांना 375 मते पडली आहेत. एकुणच पारनेर पंचायतचा निकाल त्रिशंकू लागला असून शहर विकास आघाडी व भाजपाच्या विजयी उमेदवारांना प्रचंड महत्व आले आहे.

प्रभागनिहाय निवडून आलेले उमेदवार व त्यांचे पक्ष असे
प्रभाग 1 :- ठाणगे कांतीलाल शालुबाई – शिवसेना, प्रभाग 2 ः – सुप्रिया सुभाष शिंदे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रभाग 3 :- योगेश अशोक मते ड्ढ अपक्ष, प्रभाग 4 :- नवनाथ तुकाराम सोबले – शिवसेना, प्रभाग 5 :- नितीन रमेश अडसूळ – राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत, प्रभाग 6 :- निता विजय औटी – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रभाग 7 :- विद्या अनिल गंधाडे – शिवसेना, प्रभाग 8 :- भूषण उत्तम शेलार – पारनेर शहर विकास आघाडी, प्रभाग 9 :- हिमानी रामजी नगरे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रभाग 10 :- सुरेखा अर्जुन भालेकर – पारनेर शहर विकास आघाडी, प्रभाग 11:- अशोक फुलाजी चेडे – भाजपा, प्रभाग 12 :- विद्या बाळासाहेब कावरे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रभाग 13 :- विजय सदाशिव औटी – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रभाग 14 :- निता देवराम ठुबे – शिवसेना, प्रभाग 15 :- जायदा राजू शेख – शिवसेना, प्रभाग 16 :- युवराज कुंडलिक पठारे – शिवसेना, प्रभाग 17 :- प्रियांका सचिन औटी – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

COMMENTS