Homeताज्या बातम्या

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत फातिमा सलीम सय्यद पात्र; मिलिया प्रा. मुलींच्या शाळेच्या यशात मानाचा तुरा

बीड: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता चौथीच्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ चा तात्पुरता निकाल जाही

शिक्षक संघटना एवढ्या निद्रिस्त कशा? डॉ. नंदकुमार उघाडे यांचा संतप्त सवाल; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंब्याचे आवाहन
तुलसी महाविद्यालयात विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू; आयटी, डेटा सायन्स, व्यवस्थापन व पत्रकारिता क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी
प्रा. डॉ. श्रीमंत तोंडे यांची करिअर कट्टा बीड तालुका समन्वयकपदी निवड; विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

बीड: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता चौथीच्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ चा तात्पुरता निकाल जाहीर झाला असून, बीड येथील मिलिया प्राथमिक मुलींची शाळा, भलदारपुरा येथील विद्यार्थिनी फातिमा सलीम सय्यद हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. फातिमा ही या परीक्षेत ’पात्र’ ठरली असून, तिने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

फातिमाने ३०० गुणांपैकी १३२ गुण (४४ टक्के) मिळवत ही उल्लेखनीय कामगिरी केली. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे. फातिमाच्या यशामागे शाळेतील शिक्षिकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सबिया खतीब, नजुम साहेर खतीब, शाझिया खान आणि अर्जुमंद फातेमा यांनी तिच्याकडून सातत्यपूर्ण मेहनत करून घेत परीक्षेची उत्कृष्ट तयारी करून घेतली. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मिर्झा कनीज फातेमा आणि इंचार्ज रिझवाना बेगम कादरी यांच्या सक्षम नेतृत्व व प्रेरणेमुळे विद्यार्थिनीला हे यश मिळवता आले.

फातिमा सलीम सय्यद हिच्या या यशाबद्दल मिलिया स्कूलचे व्यवस्थापन, शिक्षकवृंद, तिची आई नुरियाहान सय्यद, कुटुंबीय व नातेवाईकांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS