Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ईपीएस ९५ निवृत्त कर्मचाऱ्यांचे धुळ्यात रस्ता रोको

धुळे प्रतिनिधी - विविध मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्या ईपीएस ९५ निवृत्त कर्मचारी संघटनेच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आज धुळे शहरातील मुंबई

अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच ठरणार
तब्बल 8 वर्षांनी हुर्रे : कोळे येथील शर्यतीत सैदापूरची बैलगाडी पहिली
माजी आमदार विश्‍वासराव आत्माराम पाटील यांचे निधन

धुळे प्रतिनिधी – विविध मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्या ईपीएस ९५ निवृत्त कर्मचारी संघटनेच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आज धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावर ईपीएस ९५ निवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतात ईपीएस ९५ पेन्शनर किमान रुपये ७,५०० अधिक महागाई भत्ता, दरमहा पेन्शन व वैद्यकीय सुविधा आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. त्यांनी स्वतः त्यांच्या वेतनातून दरमहा रुपये ४,१७,५४१ व १,२५० असे योगदान दिले असून त्यांना आता फक्त एक हजार ते तीन हजार एवढेच तुटपुंजे पेन्शन मिळणे ही त्यांची थट्टाच आहे. औद्यागिक, सहकारी, सार्वजनिक, खासगी क्षेत्रात यांनी आपल्या आयुष्याची ३० ते ३५ वर्षे खर्ची घालूनही त्यांना वृद्धावस्थेत रस्त्यावर यावे लागत आहे, ही शोकांतिका आहे. यासाठी आज धुळ्यात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रीय संघर्ष समिती ईपीएस ९५ मागील पाच-सहा वर्षांपासून आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून प्रयत्न करीत आहे़. या संदर्भात प्रधानामंत्री यांची दोन वेळा भेट घेऊन आता पर्यंत फक्त आश्वासन मिळाली आहेत. केंद्रीय श्रममंत्री, वित्तमंत्री यांची अनेक वेळा भेट घेऊनही मागणी पूर्ण होत नाही म्हणून राष्ट्रीय संघर्ष समितीच्या आदेशानुसार आज मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलकांनी सांगितले की, सरकारने किमान 7500 रूपये पेंशन व महागाई भत्त्याची घोषणा करावी. तसेच आमच्या इतर मागण्या देखील मान्य कराव्यात अन्यथा यापुढे यापेक्षाची तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

COMMENTS