Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तलवाडा शाळेत दहावी-बारावी निरोप सोहळा

पी.एस.आय. कोळींचा संदेश; या वयात इश्क नव्हे, यश महत्त्वाचेगेवराई । प्रतिनिधीमाध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तलवाडा येथे नुकताच दहावी व बारावी व

जमिनीच्या वादातून उमापूरमध्ये शेतकर्‍याचे कडबा गांजी व टायर जाळले; वाहनांची तोडफोड, लाखोंचे नुकसानचकलंबा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल; अ‍ॅट्रॉसिटीची धमकी दिल्याचा आरोपकारवाई न झाल्यास सोमवारी शेख कुटुंबीयांचा आत्मदहनाचा इशारा
रंगनाथ महाराज संस्थान, मादळमोही येथे धर्मनाथ बीज उत्सव उत्साहात साजरा
भागुजीराव ढेकळे विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून साजरा

पी.एस.आय. कोळींचा संदेश; या वयात इश्क नव्हे, यश महत्त्वाचे
गेवराई । प्रतिनिधी
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तलवाडा येथे नुकताच दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा निरोप सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तलवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मा. कोळी साहेब होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत म्हटले, या शैक्षणिक वयात इश्क नव्हे, तर यशाकडे लक्ष द्या. मेहनत करा, अभ्यास करा; इश्क आपल्याकडे नंतर येईल.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक व प्राचार्य अरुण हाटकर होते. याशिवाय कला व विज्ञान महाविद्यालय मारफळाचे प्राचार्य प्रा. डॉ. उमेश राजुरकर, अंतरवालीचे माजी उपसरपंच मा. किरण अण्णा वावरे, राहेरीचे माजी सरपंच विलास कुशेकर, गंगावाडीचे उपसरपंच मुकेश बोराडे, युवा कार्यकर्ते नितीन गर्जे, चंद्रकांत समगे, पोलीस कॉन्स्टेबल रुपनर साहेब, तसेच पत्रकार अल्ताफ कुरेशी, विनोद हातागळे, अनिल वावरे, विठ्ठल पिंपळे उपस्थित होते. सर्व कार्यक्रम सरस्वती पूजन व माता रमाई जयंती साजरी करून सुरू झाला. या वेळी विद्यार्थ्यांनी – सुहानी आठवले, उजमा शेख, वैष्णवी झणझणे, सोहेल पठाण, वैष्णवी व ऋतुजा बोराडे – आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. गायत्री जाधव व शुभांगी राऊत यांनी केले. नववी, दहावी, अकरावी आणि बारावी वर्गांचे सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार जाधव एल.जे. सर यांनी मानले. नाश्त्यानंतर सोहळा संपन्न झाला.

COMMENTS