Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवरायांनी वापरलेली वाघनखं भारतात आणणार ः मुनगंटीवार

पुणे : स्वराज्यावर चालून आलेला विजापूरच्या आदिलशहाचा सरदार अफझाल खान याचा वध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 1659 मध्ये वापरलेली वाघनखं लवकर

शिरुरमधून डॉ. कोल्हेच लढणार लोकसभा
उत्तराखंड, केरळमध्ये मुसळधार; महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना ’यलो’ अलर्ट
बाल संस्कार शिबीर बदलत्या काळाची गरज ः महंत उद्धव महाराज

पुणे : स्वराज्यावर चालून आलेला विजापूरच्या आदिलशहाचा सरदार अफझाल खान याचा वध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 1659 मध्ये वापरलेली वाघनखं लवकरच भारतात आणली जाणार आहेत. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. सप्टेंबर महिन्याच्या अखेरील या संदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारचे प्रतिनिधी लंडनला भेट देणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही वाघनखे सध्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये प्रदर्शनास आहेत. या म्युझियमशी महाराष्ट्र सरकार करार करणार आहे, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. ठरल्याप्रमाणे सर्व प्रक्रिया पार पडल्यास याच वर्षी ही वाघनखे भारतात येतील. ब्रिटनने ही वाघनखं परत करण्याचे मान्य केले आहे. तसे पत्र राज्य सरकारला आले आहे. शिवाजी महाराजांनी ज्या दिवशी अफझलखानाला मारले, त्याच तिथीला ही वाघनखे भारतात आणली जातील. इतर काही तारखांचाही विचार करण्यात येत असून वाघनखे नेमकी कशी आणायची, याचेही नियोजन केले जात आहे, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

COMMENTS