Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तूर व हरभरा खरेदीला मुदतवाढ

मुंबई : राज्यातील शेतकर्‍यांच्या मागणीचा विचार करून केंद्र शासनाने खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत तूर व हरभरा खरेदीसाठी मुदतवाढ दिली आहे. तसेच हरभरा

संशोधनाचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे; कुलगुरू डॉ. विलास खर्चे; नाविन्यपूर्ण विस्तार पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन
अतिवृष्टीग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित; प्रशासनावर निष्काळजीपणाचे आरोप; दोषींवर कारवाईची ‘स्वाभिमानी’ची मागणी
अकोले बाजार समितीत कांद्याला तेराशे रुपयांचा भाव
अकोला, वाशीम जिल्ह्यांत तूर, हरभरा खरेदी नावापुरतीच

मुंबई : राज्यातील शेतकर्‍यांच्या मागणीचा विचार करून केंद्र शासनाने खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत तूर व हरभरा खरेदीसाठी मुदतवाढ दिली आहे. तसेच हरभरा खरेदीत आणखी 58 हजार 632 मेट्रिक टन वाढ केली असून आता राज्यात 8 लाख 19 हजार 882 मेट्रिक टन हरभरा खरेदी करता येणार असल्याची माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्य शासनाच्या मागणीनुसार तूर खरेदीची मुदत 31 मे 2026 पर्यंत तर हरभरा खरेदीची मुदत 29 मे 2026 पर्यंत वाढवून दिली आहे. तसेच हरभरा खरेदीत 58 हजार 632 मेट्रिक टन उद्दिष्ट वाढवून दिले, याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी आभार मानले. मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, सुरुवातीला केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेअंतर्गत तूर खरेदीसाठी 90 दिवसांचा तर हरभरा खरेदीसाठी 60 दिवसांचा कालावधी मंजूर करण्यात आला होता. मात्र राज्यातील शेतकर्‍यांकडून मुदतवाढीची सातत्याने मागणी होत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पणन विभागाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून अतिरिक्त मुदतवाढ मिळवून दिली. किमान हमीभाव योजनेअंतर्गत तूर खरेदीला 1 फेब्रुवारी 2026 पासून सुरुवात झाली असून, 1 मेपर्यंतचा कालावधी आता 31 मे 2026 पर्यंत वाढविण्यात आला आहे. खरीप हंगाम 2025-26 साठी राज्याला 3 लाख 37 हजार मेट्रिक टन तूर खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत 37 हजार 801 शेतकर्‍यांकडून 6 लाख 82 हजार 37 क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.

COMMENTS