कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे लाच घेतांना अटक; नाशिक जिल्हा परिषदेत लाचखोरी पुन्हा समोर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे लाच घेतांना अटक; नाशिक जिल्हा परिषदेत लाचखोरी पुन्हा समोर

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेत लाचखोरीच्या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली असून, एका महिला अधिकार्‍यासह दोन जणांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आ

राजकीय नेत्यांनी मर्यादा पाळल्या पाहिजेत : मंत्री छगन भुजबळ
भरधाव टेम्पोने साईभक्तांना चिरडले, एकाचा मृत्यू
भोंदू खरातला असलेला राजाश्रय!
The current image has no alternative text. The file name is: 9pg335rs_nashik-zp-bribe-case_625x300_19_March_26-e1774071632347.jpg

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेत लाचखोरीच्या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली असून, एका महिला अधिकार्‍यासह दोन जणांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे प्रशासनातील गैरप्रकार पुन्हा एकदा उघडकीस आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लघु पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे आणि वरिष्ठ सहाय्यक अरुण धारणकर यांना अटक करण्यात आली आहे. एका कंत्राटदाराचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे सुमारे सोळा लाख रुपयांचे बिल मंजूर करून देण्यासाठी या दोघांनी लाचेची मागणी केली होती. सुरुवातीला बहात्तर हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र, चर्चेनंतर पन्नास हजार रुपयांवर व्यवहार ठरल्याचे समोर आले. ठरल्याप्रमाणे रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून दोघांनाही जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत रंगेहात पकडले. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असून, या व्यवहारामागे आणखी कोणी संबंधित आहे का, याचाही तपास केला जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यातील ही दुसरी मोठी कारवाई असल्याने प्रशासनातील पारदर्शकतेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेमुळे सरकारी यंत्रणेत शिस्त आणि उत्तरदायित्व अधिक कडक करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. लाचखोरीसारख्या प्रकारांवर कठोर कारवाई झाल्यासच नागरिकांचा प्रशासनावरचा विश्‍वास दृढ राहू शकतो.

COMMENTS