Homeदेशविदेश

ऑस्ट्रेलियात माथेफिरूच्या हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू

सिडनी : ऑस्टे्रलिया या देशातील मॉलमध्ये हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली असून, या हल्ल्यात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली

… तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल आरक्षण रोखू ; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला इशारा
बीड जिल्ह्यातील खतांचा साठा व काळाबाजार रोखा : पालकमंत्री धनंजय मुंडे
तैवान कडून भारताला दिवाळीची मोठ गिफ्ट

सिडनी : ऑस्टे्रलिया या देशातील मॉलमध्ये हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली असून, या हल्ल्यात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातील एका शॉपिंग मॉलमध्ये शनिवारी चाकूने वार केल्याची घटना उघडकीस आली. यामध्ये नऊ महिन्यांच्या चिमुकल्यासह 4 जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
ऑस्ट्रेलियाच्या शॉपिंग सेंटरमध्ये घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. हल्ल्यानंतर मॉलमध्ये एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली. लोक आपले प्राण वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हजारो लोकांना मॉलमधून बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिडनीतील बोंडी जंक्शनवर हा हल्ला करण्यात आला. दुकानदारांना लक्ष्य करण्याचा हल्लेखोरांचा उद्देश होता, असे सिडनी पोलिसांचे मत आहे. मॉल कॅम्पसमध्ये इमरर्जन्सी सेवा बहाल करण्यात आल्या आहेत. लोकांना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबाराचा आवाज ऐकल्याच स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. त्यानंतर लोकांना तिथून पळताना पाहिले. शनिवारी दुपारी खरेदीसाठी हा मॉल खच्चून भरलेला होता. सध्या मॉल बंद करण्यात आला आहे. पोलिस या घटनेसंबंधी चौकशी करत आहेत. हल्लेखोर कुठून आले? त्यांची मागणी काय होती? याचा पोलिस शोध घेत आहेत.

हल्ल्याचे कारण अजूनही अस्पष्ट
यासंदर्भात अधिक माहिती देतांना सिडनीचे पोलिस आयुक्त अँथनी कुक म्हणाले की, हल्लेखोर एकटाच मॉलमध्ये घुसला. त्याच्यासोबत अन्य कोणीही नव्हते. हल्लेखोराशी संबंधित कोणतीही माहिती सध्या समोर आलेली नाही. हल्ल्याचे कारणही सध्या समजू शकलेले नाही. या प्रकरणी पोलिस पथक तपास करत आहे.

COMMENTS