Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रदूषण रोखण्यासाठी रस्त्यांवर पाणी मारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

मुंबई ः राज्यात प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राजधानी दिल्ली पाठोपाठ मुंबई देशातील सर्वात प्र

धनगर समाजाला आदिवासींच्या योजना लागू करणार
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा शब्द
सीमाप्रश्‍नी आज विधिमंडळात ठराव मांडणार

मुंबई ः राज्यात प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राजधानी दिल्ली पाठोपाठ मुंबई देशातील सर्वात प्रदुषित शहर ठरले आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेसाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत वायू प्रदूषण टाळण्यासाठी आणि धूलिकण कमी करण्यासाठी पाण्याचा मारा करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. मुंबईतील रस्त्यांवरील धुळीला आळा घालण्यासाठी पाण्याची फवारणी करण्याकरीता 1000 टँकर्स लावावेत त्यासाठी विशेथ पथक नियुक्त करावे. तसेच पालिकेच्या कर्मचार्‍यांचे विशेष पथक देखील तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी त्यांचे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सांगितले होते. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले होते. मुंबईत सध्या वाढत्या वायू प्रदूषणाने नागरिकांची चिंता वाढवली असून वायू प्रदूषण कमी करण्यासाठी राज्यातील रेल्वे जंक्शन, गार्डन आणि रुग्णालयात एअर फिल्टर बसवले जाणार असल्याची माहिती शिंदे गटातील नेते दिपक केसरकर यांनी दिली होती. दरम्यान, आज झालेल्या बैठकीत मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी पाण्याचा मारा, धूळ बसवण्यासाठी टँकरने पाण्याचे फवारे आदि आदेश देण्यात आले आहे. मुंबईतील रस्ते धूळमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने विशेष पथके तयार करावी, अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्या आहेत. या बैठकीत हवामान बदल विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कर्मचारी उपस्थित होते.

प्रदूषण विरोधी मोहीम लोकचळवळ झाली पाहिजे – प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रदूषण विरोधी मोहीम लोकचळवळ झाली पाहिजे, असे म्हटले आहे. तसेच धूलिकण कमी करण्यासाठी बांधकाम प्रकल्पाच्या तहीयाणी स्मॉग गन स्प्रिंकलर बसवण्यात यावे. एमएमआरडीएच्या बांधकाम साईट धुळमुक्त करा. या सोबतच अर्बन फॉरेस्टवर भर द्यावा. मुंबईतील रस्ते धूळमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने विशेष पथके तयार करावी. या साठी वॉटर टँकरची संख्या वाढवावी. मुंबईतले प्रमुख रस्ते पाण्याने धुण्यात यावे, यामुळे धूलिकण कमी होऊन प्रदूषण कमी होईल. विविध बांधकाम साईट वर प्रदूषण रोखण्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत, त्याचे काटेकोरपणे पालन केले जावे. दोन दिवसांआधी मुख्य सचिवांच्या उपस्थितीत मुंबई आणि आजूबाजूच्या पालिका आयुक्तांची बैठक पार पडली होती, ज्यात आयुक्तांना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याची अंबलबजावणी व्हावी.

COMMENTS