Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाची नोटीस

निवडणूक खर्चामध्ये मोठी तफावत 48 तासांत खुलासा करण्याचे आदेश

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे तर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यामध्ये थेट लढत होतांना द

शिंदे फडणवीस सरकार एक दिवशी कोसळेल ः दिलीप वळसे पाटील
मुख्यमंत्र्यांकडून विठ्ठलाची शासकीय महापूजा
मोहम्मद फैजल यांना पुन्हा खासदारकी बहाल

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे तर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यामध्ये थेट लढत होतांना दिसून येत आहे. मात्र शुक्रवारी या दोन्ही उमेदवारांना निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चात तफावत आढळून येत असल्याच्या कारणामुळे नोटीस बजावली आहे. तसेच याप्रकरणी 48 तासांमध्ये खुलासा करण्याचे आदेश दिले आहे. खुलासा न केल्यास खर्चातील तफावत उमेदवारांना मान्य आहे, असे समजले जाईल असेही आयोगाने म्हटले आहे. याबाबत जिल्हा खर्च निरीक्षण समितीकडे दाद मागता येणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यातील मतदान येत्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. बारामती लोकसभा मतदार संघासाठी मतदान 7 मे रोजी आहे. मात्र, त्या पूर्वीच अजित पवार आणि शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने धक्का दिला आहे. बारामती मतदारसंघाच्या निवडणूक खर्चाच्या दुसर्‍या तपासणीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोन्ही उमेदवारांनी दाखविलेला आणि प्रशासनाकडे असणार्‍या खर्चात मोठी तफावत आढळळी आहे. यामुळे महाआघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी नोटीस बजावली आहे. दोन्ही उमेदवारांना निवडणूक आयोगाने दोन दिवसांची मुदत दिली असून या बाबत खुलासा करण्याचे आदेश दिले आहे. तसेच खुलासा न दिल्यास ही तफावत मान्य असल्याचे ग्राह्य धरून हा खर्च त्यांच्या खात्यात दाखविला जाणार आहे. बारामती मतदारसंघात निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या प्रचार खर्चाची दुसरी तपासणी नुकतीच करण्यात आली आहे. त्यानुसार सुळे आणि पवार यांनी दाखविलेल्या खर्चात अनुक्रमे 1.3 लाख आणि 9.10 लाख रुपये खर्चाची मोठी तफावत आढळली आहे. ही तफावत दोन्ही उमेदवारांच्या प्रतिनिधीने अमान्य केली आहे. यामुळे निवडणूक आयोगाने याबाबत दोन दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दोन्ही उमेदवारांना दिले आहे. याबाबत जिल्हा खर्च निरीक्षण समितीकडे दाद मागीतली जाणार आहे. सध्या दोन्ही उमेदवारांचा प्रचार जोरदार सुरू आहे. जास्तीत जास्त मतदारांपर्यन्त पोहचण्याचा प्रयत्न दोन्ही उमेदवार करत आहे. त्यांचे भवितव्य 7 मे रोजी ईव्हीएममध्ये कैद होणार आहे.

निवडणूक खर्चात तफावत किती  – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा 28 एप्रिलपर्यंत एकूण खर्च 37 लाख 23 हजार 610 इतका झाला आहे. खर्च प्रतिनिधीने सादर केलेल्या खर्चाशी निवडणूक अधिकार्‍यांनी त्यांच्यांकडील रजिस्टरशी तुलना केल्यावर त्यात 1 लाख 3 हजार 449 रुपयांची तफावत आढळून आली आहे. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांचा 28 एप्रिलपर्यंतचा खर्च 29 लाख 93 हजार 31 रुपये इतका आहे. उमेदवाराच्या खर्च प्रतिनिधीने सादर केलेल्या खर्चाशी निवडणूक अधिकार्‍यांनी त्यांच्याकडील रजिस्टरशी तुलना केल्यावर त्यात 9 लाख 10 हजार 901 रुपयांची तफावत आढळली आहे.

COMMENTS