Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदिनाथ ढाकणे यांची नदी प्रहरी म्हणून निवड

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते शासनाच्या चला जाणूया नदीला या महत्त्वाच्या प्रकल्पाचे अगस्ती या नदीचे समन्वयक आदिनाथ ढाकण

जिल्ह्यातील रुग्णांच्या वेदना मुक्तीसाठी आ.संग्राम जगताप यांचा पुढाकार
संत सावता माळी कोपरगाव तालुका संघटकपदी माळवदे
वैष्णवदेवी बालमित्रांनी साकारली किल्ल्याची प्रतिकृती

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते शासनाच्या चला जाणूया नदीला या महत्त्वाच्या प्रकल्पाचे अगस्ती या नदीचे समन्वयक आदिनाथ ढाकणे यांची नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान 2.0 मध्ये चला जाणूयां नदीला या नदी प्रहरी म्हणून निवड करण्यात आली आहे.

आदिनाथ ढाकणे हे प्रसिद्ध सिनेअभिनेते चिन्मय उदगीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरातून वाहणार्‍या पवित्र अशा गोदावरी नदीची गेल्या 228 आठवड्यापासून आपल्या गोदामाई प्रतिष्ठान मार्फत युवकांना एकत्रित करत गोदावरी नदी किनार्‍यांची स्वच्छता करत आहे. तसेच मिळेल तिथे वृक्षारोपण करत विविध सामाजिक उपक्रमातून नदी स्वच्छतेचे महत्व पटवून देत आहे. त्यांच्या या अप्रतिम कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाचे मृदा व जलसंधारण विभागाअंतर्गत राबविण्यात येणार्‍या जलयुक्त शिवार अभियान 2.0 मध्ये नदी प्रहरी म्हणून निवड करण्यात आल्याने कोपरगावच्या शिरपेचात आदिनाथ ढाकणे यांच्या रूपाने मानाचा तुरा खोवला गेला आहे.

जलयुक्त शिवार अभियान 2.0 हे विविध योजनांच्या अभिसरणातून राबविण्यात येत असून त्याबाबत शासन निर्णय 3 जानेवारी रोजी निर्गमित करण्यात आला आहे. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्व नद्यांना अमृतवाहिनी करण्यासाठी नदी संवाद यात्रा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहेत. सदरील यात्रेसाठी व नद्यांचा अभ्यास करण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दिनांक 14 ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार समिती गठीत करण्यात आली असून, त्यामध्ये नदी प्रहरीचा समावेश करण्यात आला आहे. नदी प्रहरामध्ये जलयुक्त शिवार अभियान 2.0 मधील नद्यांना प्राधान्याने नदी संवाद यात्रेमधील छोट्या नद्या, नाले आणि तलाव यांच्या उपचारांना आणि गाळ काढण्याचे कामाना प्राधान्य देण्यात येणार आहे.

COMMENTS