Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंबाजोगाई मुकुंदराज संस्थान येथे कार्यक्रमाचे आयोजन

अंबाजोगाई प्रतिनिधी- अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथील श्रीहरी महाराज शिंदे आपेगावकर यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त  अमृतमहोत्सव सोहळा आणि सत्क

केजरीवालांचा पाय खोलात
मुंबईत साडेपाच लाख घरे रिकामी
धो धो पाऊस अन् नदीपात्रात पेटती चिता

अंबाजोगाई प्रतिनिधी- अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथील श्रीहरी महाराज शिंदे आपेगावकर यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त  अमृतमहोत्सव सोहळा आणि सत्कार समारंभाचे आयोजन मुकुंदराव संस्थान अंबाजोगाई येथे ता. 23 रविवार रोजी करण्यात आले आहे.
वारीसांप्रायदयाचा पाया हा वै. ह.भ.प.बंकट स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरूवात झाली पंजोबा तुळशीराम दादा शिंदे  प्रल्हादा  शिंदे  चुलते पद्मश्री शंकरबापू आपेगांवकर वडील दत्तात्रय शिंदे यांच्या  छाया खाली त्याचा वटवृक्ष झाला. शंभर वर्षापासून सुरू असलेली पंढरपूर वारी आणि अखंड हरिनाम सप्ताह परंपरा पुढे सुरू ठेवून तो वटवृक्ष जपन्याचा प्रयत्न श्रीहरी महाराज शिंदे आपेगावकर करत आहेत. कीर्तनकार श्रीहरी महाराज शिंदे आपेगावकर यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त  अमृत महोत्सव सोहळा आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार विक्रम काळे तर शुभ आशीर्वाद देण्यासाठी ह भ प लक्ष्मण महाराज मेंगडे ,महादेव महाराज बोराडे शास्त्री ,किसन महाराज पवार, श्रीकृष्ण महाराज चव्हार आणि प्रमुख पाहुणे म्हणून आंबा साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर व्हाईस चेअरमन दत्ताभाऊ पाटील माजी चेअरमन, माजी चेरमन पांडुरंग पवार ,राष्ट्रवादी काँग्रेसचे  डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळ यांची प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. सकाळी 9 ते 11 या वेळेत ह भ प मधुसूदन महाराज दैठनेकर  यांचे कीर्तन होणार असून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान तालमणी उद्धव बापू आपेगावकर, संतोष  शिंदे आपेगावकर ,मुकुंदराज संस्थान अंबाजोगाई यांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS