Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांच्या हितासाठी बाजार समितीची निवडणूक लढणार ः दिनभर टापरे

जामखेड/प्रतिनिधी ः अनेक महिण्यांपासुन रखडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीमध्ये अनेक इच्छुक उ

प्रोत्साहन निधीपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार – विधानपरिषद आमदार सुनिल शिंदे
आरपीआयचे पवन भिंगारदिवे यांचे भिंगार कॅम्प पोलीसस्टेशन समोर उपोषण सुरू
कृषि विद्यापीठाच्या क्षारपड जमीन क्षारमुक्त

जामखेड/प्रतिनिधी ः अनेक महिण्यांपासुन रखडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीमध्ये अनेक इच्छुक उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहेत. यावेळी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक ग्रामपंचायत पँनल मधून लढविण्यास पाटोदा ग्रामपंचायत सदस्य दिनभर टापरे इच्छुक आहेत. निवडणूक पुर्वतयारी म्हणून पाटोदा पंचक्रोशीतील शेतकरी व मतदारांशी कायम भेटीगाठी चालू आहेत. दिनकर टापरे हे माजी मंत्री तथा आमदार प्रा राम शिंदे यांचे खंदे समर्थक आहेत. पाटोदा ग्रामपंचायतचे दोन वेळा सदस्य राहिले आहेत. हरिओम बहुद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. भाजपा यूवा मोर्चाचे तालुकाउपाध्यक्ष असून पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात व निवडणूकांमध्ये सक्रिय सहभागी असतात. प्रत्येक निवडणुकीत क्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यात मोठा वाटा राहिला आहे. शेतकर्‍यांच्या प्रत्येक प्रश्‍नाच्या सोडवणूकीसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत शेतकरयांना मदत करतात.  पाटोदा पंचक्रोशीत त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. दिनकर टापरे हे सेवाभावी वृत्तीचे युवा नेतृत्व आहे. एक यूवा उद्योजक आहेत. आपल्या उद्योगाच्या माध्यमातून  संपूर्ण तालुक्यात चांगला संपर्क आहे. उद्योगाच्या माध्यमातून अनेक लोकांना अडीअडचणीत मदत करतात. पाटोदा पंचक्रोशीतील अनेक कार्यकर्त्यांनी व सहकार्यांनी आपण बाजार समितीची निवडणुक लढवावी असा आग्रह धरला आहे. मी निवडणुकीसाठी पुर्ण तयारीत आहे . शेतकर्‍यांच्या हितासाठी निवडणूक लढण्यास तयार आहे . मी  पक्षनिष्ठ व एकनिष्ठ कार्यकर्ता आहे म्हणून आमचे नेते पक्षनेतृत्व आ. प्रा राम शिंदे उमेदवारीबाबत जो निर्णय घेतील तो मान्य असेल असे ग्रामपंचायत सदस्य दिनकर टापरे यांनी सांगितले.

COMMENTS