Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहराच्या वैभवात भर पडेल असे काम करा ः उपमुख्यमंत्री पवार

पुणे/प्रतिनिधी ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण निगडी येथील शरदनगर आणि दुर्गानगरच्या 670 झोपडीधारक सभासदांच्या पुनर्व

‘गाथा परिवार’आणि ‘अभंग एकविशी- तुकोबारायांची’ पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते
‘पुणे-नाशिक रेल्वेमार्ग’ हा मेट्रो कायद्यानुसार करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
सुरगाणा, कळवण तालुक्यातील सिंचन योजनांना निधी देऊन गती देणार -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे/प्रतिनिधी ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण निगडी येथील शरदनगर आणि दुर्गानगरच्या 670 झोपडीधारक सभासदांच्या पुनर्वसन प्रकल्पाला भेट दिली. प्रकल्पाची माहिती घेत शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालणारे काम अधिकार्‍यांनी करावे अशी अपेक्षा अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनय चौबे, सुनील नहार आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी सदनिकातील सुविधा, सौर ऊर्जेची व्यवस्था, इमारतीची सुरक्षा, देखभाल आणि स्वच्छता, परिसरातील वृक्षारोपण, जलपुनर्भरण आदीविषयी माहिती घेतली. इमारतीच्या परिसरात स्वच्छता राखावी, प्रकल्पातील विविध सेवांसाठी स्थानिकांना संधी द्यावी अशा सूचना देखील त्यांनी केल्या. पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात याप्रसंगी दोन झोपडी धारकांना सदनिकांचे हस्तांतरण करण्यात आले. इमारतीत चांगल्या सुविधा देण्यात आल्या असून त्या नीटपणे वापराव्यात. घरासोबत इमारतही स्वच्छ व सुंदर राहील असा सर्वांनी प्रयत्न करावा, असे त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले. मेट्रो सुविधा निगडीपर्यंत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले. महानगरपालिका आयुक्त सिंह यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली. उपमुख्यमंत्री पवार यांनी श्री मोरया गोसावी समाधी मंदिराला भेट देऊन समाधीचे दर्शन घेतले आणि श्री गणेशाची आरती केली. त्यांनी पिंपरी चिंचवड येथील विविध गणेश मंडळांना भेट देऊन गणपतीचे दर्शन घेतले.

COMMENTS