Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मळेगावथडीत 1 कोटी 19 लाखाचे विकासकामे पूर्ण ः अनिता उगले

कोपरगाव प्रतिनिधी ः तालुक्यातील मळेगाव थडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संधी मिळाल्याने गेल्या 2 वर्षाच्या कालावधीत ग्रामपंचायत अंतर्गत 1 कोटी 19 ला

तुमचे आजचे राशीचक्र बुधवार, ०९ जून २०२१ l पहा LokNews24
पत्रकार सोमनाथ कचरे यांची शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड
श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |

कोपरगाव प्रतिनिधी ः तालुक्यातील मळेगाव थडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संधी मिळाल्याने गेल्या 2 वर्षाच्या कालावधीत ग्रामपंचायत अंतर्गत 1 कोटी 19 लाख 29 हजार रूपयांची विकासकामे पुर्ण करता आली अशी माहिती सरपंच अनिता किरण उगले यांनी दिली.

उगले पुढे म्हणाल्या की, भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली व गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, संजीवनी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सखाहरी उगले व मळेगांवथडी सोसायटीचे माजी अध्यक्ष संतोष दवंगे तसेच उपसरपंच मुकेश चंद्रे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ग्रामस्थांच्या सहकार्याने गेल्या 2 वर्षाच्या कालावधीत मळेगांथडी पंचकोशीत एकलव्य नगर मध्ये गटार (3 लाख 14 हजार 700), आर ओ रोड दुरूस्ती (1 लाख 50 हजार), जिल्हा परिषद शाळा गावठाण संरक्षक कंपाउंड (2 लाख 50 हजार), गावठाण अंगणवाडी शौचालय (50 हजार), निलाववाडी अंगणवाडी शौचालय (50 हजार), निलाववाडी पिण्यांच्या पाण्यांचा आर ओ प्लॅट (5 लाख), जिल्हा परिषद निधी अंतर्गत गावठाण शाळा (2 लाख) पाण्यांची टाकी, आदिवासी वस्तीत हायमॅक्स (4 लाख), सन 2021.22 या आर्थीक वर्षात 9 सायकली (45 हजार), दिव्यांग कल्याण निधीतुन रूपाबाई मोरे (5 हजार), किराणा वाटप (38 हजार), चारी क्रमांक 5 रस्ता (4 लाख 89 हजार 311), गावठाण गटार (4 लाख), अंगणवाडी वजनकाटे (4 हजार 800), सेवकर वस्ती ते दवंगे वस्ती रस्ता (15 लाख), 42 घरकुले पुर्ण (प्रत्येकी दीड लाख रूपये प्रमाणे 63 लाख), बिहार पॅटर्न अंतर्गत स्मशानभूमी परिसरात 450 झाडांचे वृक्षारोपण, स्वच्छ भारत योजनेअंतर्गत शौचालयासाठी 30 लाभार्थ्यांना प्रत्येकी 12 हजार रूपयांचे अनुदान वाटप, दवंगे वस्ती ते कदम वस्ती रस्ता (2 लाख 85 हजार), जिल्हा परिषद शाळेजवळील गटार (3 लाख), जिल्हा परिषद शाळा दवंगे वस्ती स्वच्छ भारत अंतर्गत स्वच्छतागृह (3 लाख 10 हजार), बडदे शिंदे वस्ती पेव्हींग ब्लॉक 2 लाख खर्चाची विकास कामे मार्गी लागली असुन केंद्र व राज्य शासनांच्या जल जीवनमिशन अंतर्गत मळेगांवथडी गावासाठी 6 कोटी 97 लाख 773 रूपये खर्चाची पिण्यांच्या पाण्यांची योजना मंजुर होवुन त्याचे काम सुरू झाल्याचे त्या शेवटी म्हणाल्या. मळेगावथडीतील 34 निराधारांना शासनांच्या श्रावणबाळ योजनेअंतर्गत प्रत्येकी एक हजार रुपयांचा लाभ मिळवून दिला.

COMMENTS