Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डाऊच ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग निधी वाटप

कोपरगाव शहर : कोपरगाव तालुक्यातील स्मार्ट ग्राम म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या डाउच बुद्रुक ग्रामपंचायतच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभिया

कोपरगाव शहराच्या विकासाला नवी दिशा
कोपरगावमधील शेतकऱ्यांच्या खात्यात ८० लाख जमा : रोहोम
विकास कामात गुणवत्तेबाबत तडजोड नाही : संधान; कर्मवीरनगरमधील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना गती; नगराध्यक्षांकडून पाहणी

कोपरगाव शहर : कोपरगाव तालुक्यातील स्मार्ट ग्राम म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या डाउच बुद्रुक ग्रामपंचायतच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२५-२६ अंतर्गत ५ टक्के निधीतून गावातील १७ दिव्यांग बांधवांना प्रत्येकी ७००  रुपये प्रमाणे ११ हजार ९०० रुपयांचा दिव्यांग निधी वाटप करण्यात आला.

गुरुवारी (दि. ५)  झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी कोपरगाव तालुका दिव्यांग सेलचे अध्यक्ष मुकुंद काळे,सचिव जयवंतराव मरसाळे, डाऊच गावचे सरपंच दिनेश गायकवाड, उपसरपंच यांचे पती संजय ढमाले, ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य भीमराव दहे, ग्रामपंचायत अधिकारी विजयसिंह पाटील यांच्यासह डाऊच ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य, ग्रामस्थ व दिव्यांग बांधव उपस्थित होते.

 याप्रसंगी सरपंच दिनेश गायकवाड यांनी बोलताना सांगितले की, दिव्यांग बांधवांना समाजात वावरताना सन्मानाने जीवन जगता यावे तसेच दिव्यांग लाभार्थी यांचे दैनंदिन जीवनमान उंचवावे याकरिता शासनाच्या नियमानुसार आपली ग्रामपंचायत नेहमीच बांधील असल्याचे सांगितले तर ग्रामपंचायत अधिकारी विजयसिंह पाटील यांनी दिव्यांग बांधवांकरिता शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली. या प्रसंगी दिव्यांग सेलच्या पदाधिकाऱ्यांनी व दिव्यांग बांधवांनी डाऊच बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

COMMENTS