कर्जतच्या वायसेवाडीत बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जतच्या वायसेवाडीत बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला

कर्जत/प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील वायसेवाडी परिसरामध्ये बिबट्याने शेतकर्‍यांच्या उपस्थितीमध्ये बकरी पळवून नेली. तर एका कुत्र्यावर हल्ला केला. यामध्

लोकशाही पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी संदीप दरंदले
बदलीच्या ठिकाणी हजर न होणार्‍या अधिकार्‍यांची सेवा खंडित करणार
बिजनेस एक्स्पोची व्याप्ती वाढत जाणार – आमदार आशुतोष काळे

कर्जत/प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील वायसेवाडी परिसरामध्ये बिबट्याने शेतकर्‍यांच्या उपस्थितीमध्ये बकरी पळवून नेली. तर एका कुत्र्यावर हल्ला केला. यामध्ये कुत्रा गंभीर जखमी झाला. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
वायसेवाडी येथील भीमराव देवराव भिसे यांच्या राहत्या घरी ही घटना घडली. विशेष म्हणजे बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करतानाचा थरार नागरिकांनी पाहिला. त्यामुळे परिसरात बिबट्याची केवळ अफवा नसून बिबट्याच्या वास्तव्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. भिसे हे खेड व वायसेवाडी या दोन्ही गावांच्या हद्दीत राहतात. राज्य मार्गालगत असलेल्या त्यांच्या घराशेजारी सर्व बाजूंनी उसाचे मोठे क्षेत्र आहे.
बिबट्याने केलेला हल्ला जरी पाळीव प्राण्यांवर झाला असला तरी भविष्यात बिबट्याचा हल्ला माणसांवर का होणार नाही, असा सवाल भयभीत झालेले नागरिक करत आहेत. पंधरा दिवसांपूर्वीच बिबट्याने भिसे यांची शेळी गायब केली होती. भिसे यांना बिबट्याची कुणकुणही लागली होती. मात्र, घबराट पसरू नये म्हणून त्यांनी याबाबत वाच्यता केली नव्हती. पण बिबट्याचे वारंवार होणारे दर्शन आणि प्रत्यक्षदर्शी घडलेल्या घटनेमुळे बिबट्याची भीती अधिक गडद होत चालली आहे.

घटनास्थळी भेट दिली असून परिसरातील नागरिकांना पाळीव प्राणी बंदिस्त ठेवण्याबाबत सूचना केल्या आहेत. दोन दिवसात त्या परिसरात पिंजरा लावण्याची व्यवस्था करीत आहोत. नागरिकांनी काळजी घ्यावी.
मोहन शेळके, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक), कर्जत

COMMENTS