Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेडमध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

शिवजयंतीनिमित्त उत्सव समितीचा पुढाकार ; गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन

जामखेड ः जामखेड येथे सार्वजनिक शिवजयंती महोत्सव व जामखेड तालुका डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार 12 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी

नागापूरचे रेणुकाई माळ देवस्थान गेले चोरीस ?
नऊ वर्षीय बालकाचा बसच्या धडकेत मृत्यू
९३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी केली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

जामखेड ः जामखेड येथे सार्वजनिक शिवजयंती महोत्सव व जामखेड तालुका डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार 12 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी पर्यंत जामखेड येथील शिलादीप हॉस्पिटल येथे मोफत आरोग्य तपासणी व सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून शिबीराचे उद्घाटन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी प्रा. मधुकर राळेभात, शहाजी राळेभात, अवधूत पवार, निखिल घायतडक,उमरभाई कुरेशी, नय्युम बिल्डर, विनायक राऊत, विकास पवळ, प्रशांत राळेभात, वसीम सय्यद, डॉ. कैलास हजारे, अमोल गिरमे, महेश यादव,जामखेड तालुका डॉक्टर असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत गायकवाड, सचिव डॉ सादेख पठाण, कोषाध्यक्ष डॉ. चंद्रकिरण भोसले, डॉ. भरत देवकर, डॉ अविनाश पवार, डॉ मेघराज चकोर, डॉ. आसिफ मोमीन, डॉ. विकी दळवी, डॉ विक्रांत केकाण, डॉ आबेद जमादार, डॉ सुशिल पन्हाळकर, डॉ. मेघराज चकोर सह अनेक मान्यवर उपस्थित होते.प्रा. मधुकर राळेभात तसेच विनायक राऊत यांनी बोलतांना सांगितले की या शिबिरामध्ये वेगवेगळ्या आजारांवर उपचार होणार आहेत.

तालुक्यातील गरजु रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा .शिबीरामुळे गोरगरीब रुग्णांचे पैसै वाचणार आहेत.  हा उत्सव सर्वधर्मीय साजरा होत असल्याने त्या बद्दल कौतुक वाटते. शिलादिप हॉस्पिटल चे संचालक डॉ प्रशांत गायकवाड यांनी सांगितले की या शिवजयंती उत्सवात तळागाळातील लोकांनी सहभागी व्हावे तसेच या शिबिरात पुढे कोणाला आजार होऊ नये कींवा झाला असेल तर तो वाढु नये यासाठी सर्वांनी मोफत तपासण्या करून घ्याव्यात. दि 13 फेब्रुवारी रोजी ऑर्थोपेडीक डॉ. सुशिल पन्हाळकर हे रुग्णांच्या हाडांची तपासणी करणार आहेत. दि 14 फेब्रुवारी रोजी नेत्ररोग तज्ञ डॉ. विद्या तोंडे, सर्जन सचिन टेकाडे व डॉ. सर्फराज खान हे तपासणी करणार आहेत.  दि 15 फेब्रुवारी रोजी स्त्री रोग तज्ञ डॉ. चारुदत्त पवार, बालरोग तज्ज्ञ डॉ राजु राठोड, बालरोग तज्ञ डॉ. आसिफ मोमीन व विकी दळवी हे रुग्णांच्या मोफत तपासणी करणार आहेत.  दि 16 फेब्रुवारी रोजी दंतरोग तज्ञ डॉ. प्रतिभा मुंडे, डॉ. कामरान आतार, आयुर्वेद तज्ञ आबेद जमादार, डॉ. चंद्रकिरण भोसले, होमिओपॅथिक तज्ञ डॉ. शहनाज पठाण हे तपासणी करणार आहेत तर  दि 17 फेब्रुवारी रोजी त्वचारोग तज्ञ डॉ. जी. एस. गायकवाड, नाक कान घसा तज्ञ डॉ. महावीर कटारीया डॉ. अमित पळवदे हे रुग्णांची तपासणी करणार आहेत. त्यामुळे सात दिवस चालणार्‍या या महाआरोग्य शिबिरात तालुक्यातील जास्तीत जास्त गरजु रुग्णांनी आपल्या तपासण्या करून घ्याव्यात असे अवाहन आयोजकांनी केले आहे.

COMMENTS