Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. नितेश राणेंना अटक करा सिटीचौक पोलिसात तक्रार

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यासाठी हालचाली; सुसंवादासाठी प्रयत्न सुरु असल्याची शरद पवारांची माहिती
संभाजीनगर ते पुणे मार्गावर शिवाई ई-बस सुरू
छ.संभाजीनगरमधून 500 कोटींचे ड्रग्ज जप्त
 औरंगाबाद प्रतिनिधी - प्रक्षोभक भाषण करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खा. संजय राऊत यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाने आ. नितेश राणे यांच्याविरोधात  सिटीचौक पोलिसात तक्रार दाखल केली आहे. लोकांच्या भावना भडकावून दंगल घडविण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर आ. नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना गलिच्छ भाषेत टिका केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खा. राऊत यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर शब्द वापरले. त्यामुळे जनमाणसांच्या भावना दुखावल्या आहेत. समाजात मोठा उद्रेक होऊ शकतो, हा दंगल भडकावण्याचा प्रयत्न असल्यामुळे त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. तक्रारीवर ठाकरे गटाचे उपविभाग प्रमुख संदीप चांदणे, सोमनाथ बोंबले लक्ष्मीनारायण बखरिया, सचिन लघाने, अ‍ॅड. योगेश मिटकर, लक्ष्मीनारायण पहाडिया, सचिन राठोड, रवि भुईगळ, उमेश देवगिरीकर, गजानन श्रीरामवार, उमेश पैयेवार, राजेश दायमा, निशांत काला यांच्या सह्या आहेत.

COMMENTS