बाळ बोठेचा मोबाईल क्रमांक झाला अ‍ॅक्टीव्ह? ; अनेक व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमधून झाला लेफ्ट, पोलिसांनी सुरू केली चौकशी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाळ बोठेचा मोबाईल क्रमांक झाला अ‍ॅक्टीव्ह? ; अनेक व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमधून झाला लेफ्ट, पोलिसांनी सुरू केली चौकशी

मागील तीन महिन्यांपासून पोलिसांच्या ताब्यातअसलेला पत्रकार बाळ ज. बोठे याचा मोबाईल क्रमांक सोमवारी सकाळी अचानकसुरू (अ‍ॅक्टीव्ह) झाला.

अकोले शहरात विविध उपक्रमांनी श्रीराम नवमी उत्साहात साजरी
आमदार डॉ. लाहमटे यांच्या जनता दरबारातून अनेकांचे प्रश्‍न मार्गी
समता परिवारातील सर्व महिलांचा हा सन्मान ः स्वाती संदीप कोयटे

अहमदनगर/प्रतिनिधी-मागील तीन महिन्यांपासून पोलिसांच्या ताब्यातअसलेला पत्रकार बाळ ज. बोठे याचा मोबाईल क्रमांक सोमवारी सकाळी अचानकसुरू (अ‍ॅक्टीव्ह) झाला. ते पाहून अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला. शिवाय अचानक हा मोबाईल क्रमांक अ‍ॅक्टीव्ह झाल्यानंतर अनेक व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमधून लेफ्ट झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पोलिसांपर्यंत हा विषय गेल्याने पोलिसांच्या ताब्यातील मोबाईल व त्याचे सीमकार्ड अचानक अ‍ॅक्टीव्ह होण्याच्या या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. 

रेखा जरे हत्याकांडातील प्रमुख आरोपी व दैनिक सकाळचाकार्यकारी संपादक बाळ ज. बोठे हा सध्या पारनेर पोलिसांच्या कारागृहात आहे.जरे यांच्या हत्येनंतर तो फरार झाला होता. तो सापडत नसल्याने पोलिसांनीत्याच्या घराची झडती घेतली होती. त्यावेळी त्याचा फोन, रिव्हॉल्व्हर व अन्य काहीवस्तू सापडल्या होत्या. तेव्हापासून म्हणजे सुमारे चार महिन्यांपासून तो फोन वत्याचे सीमकार्ड पोलिसांच्या ताब्यात आहे. असे असताना सोमवारी सकाळी तेसीमकार्ड अचानक अ‍ॅक्टीव्हेट झाले व त्यावरून मेसेज डिलीव्हर झाले.विविध व्हॉटस अ‍ॅप ग्रुपमधून हा मोबाईल क्रमांक स्वतःहून बाहेर (लेफ्ट)पडत असल्याचे ते मेसेज होते. या क्रमांकाला ग्रुप अ‍ॅडमीन वा अन्य सदस्यांनीत्या ग्रुपमधून रिमूव्ह (काढून टाकणे) केले नव्हते. पण हा क्रमांक स्वतःहूनग्रुपमधून बाहेर पडत असल्याचा मेसेज पडल्याने अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला.काहींनी पोलिसांकडे विचारणाही केली, तर काहींनी वरिष्ठ पोलिसअधिकार्‍यांना या मेसेजचे स्क्रीन शॉटही काढून पाठवल्याचे समजते.

पोलिसांनी सुरू केली चौकशी

आरोपी बोठेकडे असलेला त्याचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे तर दुसरा मोबाईल फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठवलेलाआहे. विशेष म्हणजे असे असताना सोमवारी अचानकपणे नगर जिल्ह्यातील अनेक व्हॉटसअ‍ॅपग्रुपमधून त्याचा नंबर लेफ्ट झाला. या संदर्भात तात्काळ जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर बोठे याचामोबाईल कशा पद्धतीने सुरू झाला आहे याची माहिती घेण्यास पोलिसांनी आता सुरुवातकेली आहे. पोलिसांच्या ताब्यात मोबाईल व सीमकार्ड असताना दुसरेसीमकार्ड कसे मिळाले, त्यासाठी काय कारण दाखवले व कोणती कागदपत्रे दिलीगेली याची माहिती घेण्याचे आदेश देताना पोलिसांच्या ताब्यातील बोठेच्यामोबाईलद्वारे कोणी काही उद्योग केला काय, याचीही चौकशी पोलिसांनी सुरूकेली आहे.

तोही झाला चर्चेचा विषय

जिल्ह्यातील काही व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमधून बाळ बोठेचा मोबाईल क्रमांक लेफ्ट होण्याचे मेसेज पडल्यावर काही वेळाने जिल्ह्यातीलआणखी एका ज्येष्ठ पत्रकाराचाही असाच मेसेज पडला. त्या पत्रकाराचा मोबाईल क्रमांकही काही ग्रुपमधून लेफ्ट होत असल्याचा हा मेसेज पाहून तोही आता चर्चेचा विषय झाला आहे.

COMMENTS