Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ई-सिटी बसला मुहूर्त कधी लागणार ?

औरंगाबाद / प्रतिनिधी ः एसटीच्या ताफ्यात ई बस दाखल झाल्या सिटी अभियानाअंतर्गत 35 वातुकूलीत ई-बसेस करारावर घेतल्या जात आहेत. या बस मार्च मध्ये येती

रोजगार हमी योजनेतील कामांच्या लेबर बजेटची आखणी करा : नंदकुमार
राज्यभर मराठा आंदोलनाची धग कायम
राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; राज्यमंत्रीही घेणार शपथ

औरंगाबाद / प्रतिनिधी ः एसटीच्या ताफ्यात ई बस दाखल झाल्या सिटी अभियानाअंतर्गत 35 वातुकूलीत ई-बसेस करारावर घेतल्या जात आहेत. या बस मार्च मध्ये येतील असे प्रशासनातर्फे सांगितले जात होते. मे महिनासंपत आला तरी स्मार्ट सिटीच्या ई बस आल्याच नाही. ई बसला कधी मुहूर्त लागणार याचीच चर्चा सुरु झाली आहे..
स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत सध्या शहरात 100 शहर बस सुरू आहेत. 45 मार्गावर या बसेस धावत आहेत. मात्र शहरांचे वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रीक बसचा वापर वाढवावा, अशा सूचना शासनाकडून करण्यात आल्या होत्या. त्यानुसार मुंबई, पुण्याच्या धर्तीवर 35 इलेक्ट्रिक बसेस करारावर चालविण्यासाठी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात 15 तर दुसर्‍या टप्प्यात 20 बस दाखल होणार आहेत. 15 बस एप्रिल महिन्यात येतील, असा अंदाज तत्कालीन स्मार्ट सिटीचे सिईओ डॉ. अभिजित चौधरी यांनी व्यक्त केला होता. बस
दहा वर्ष भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी ई. व्ही. ट्रान्स . स्मार्ट प्रा. लि. कंपनीसोबत करार करण्यात आला असून, 59 रुपये प्रतिकिलोमीटर याप्रमाणे भाडे दिले जाणार आहे. बससंदर्भात हैदराबाद येथील ओलेक्ट्रा ग्रीन टाइप कंपनी, ई. व्ही. ट्रान्स प्रा. लि. आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्टच्या अधिकार्‍यांसोबत चर्चा करून डॉ. चौधरी यांनी माहिती घेतली. त्यानंतर इलेक्ट्रिक बसची बांधणी करणार्‍या हैदराबाद येथील ओलेक्ट्रा ग्रीन टाइप कंपनीला भेट देण्यासाठी स्मार्ट सिटीचे पथक पाठविण्याचा निर्णय घेतला होता.
स्मार्ट सिटीचे मुख्य चालन व्यवस्थापक राम पवनीकर उपव्यवस्थापक मुकुंद देव व सहायक व्यवस्थापक ऋषिकेश इंगळे, केंद्रीय वाहतूक मंत्रालयाच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्स्पोर्ट कार्यालयाचे प्रतिनिधीने हैदराबाद येथील ओलेक्ट्रा ग्रीन टाइप कंपनीत बस बांधणीची पाहणी केली होती. यावेळी सीआयआरटीच्या प्रतिनिधींनी प्रवाशांसाठीच्या सुविधा वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या.

COMMENTS