Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

थंडीची लाट, महाराष्ट्र गारठला

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात थंडीमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे हवेत गारठा वाढला आहे. थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्र गारठला असून, आगामी काही दिवस थंडी का

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी व मार्गदर्शन
नाफेडच्या सब एजन्सी कडून कांदा खरेदी सुरू
शेतकऱ्यांना जुन्या दराने खताची विक्री करावी : कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात थंडीमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे हवेत गारठा वाढला आहे. थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्र गारठला असून, आगामी काही दिवस थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गुजरातकडून थंड वारे वेगाने महाराष्ट्रात दाखल झाल्याने थंडीची तीव्रता वाढली आहे. 9 जानेवारीला किमान तापमान 10 अंशांवर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र सध्या राज्यात पाऊस आणि थंडीचा दुहेरी खेळ रंगलेला आहे.

कमाल तसेच किमान दोन्हीही तापमानात कमालीची घट तसेच चढउतार होत असल्याने वातावरणही झपाट्याने बदलत आहे. नाताळानंतर राज्यातील काही भागातील थंडी कमी झाली होती. पण गेल्या दोन दिसांपासून पुन्हा एकदा राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद यासारख्या राज्यातील मुख्य शहरांमध्ये तापमानात घसरण झाली आहे. महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक-नगर, पुणे-औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया येथे आज ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. थंड हवा तब्बल 11 किमी प्रतितासाचा वेग घेत आपल्याकडे दाखल होत आहे. यामुळे अचानक 3 जानेवारीपासून तापमानात मोठा बदल झाला. नववर्षाच्या सुरुवातीला थंडी राहणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, 3 तारखेनंतर वातावरणात बदल झाला. मागील दोन दिवसांपासून सूर्यदर्शन तब्बल नऊ ते साडेनऊ वाजेनंतर होत असल्याचे नागरिकांनी अनुभवले आहे. ही स्थिती पुढील पाच दिवस म्हणजेच 9 जानेवारी रोजीपर्यंत कायम राहणार असून, थंडीत मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यात पावसाची शक्यता – राज्यात गेल्या तीन दिवसांपासून तापमानात मोठा बदल झाला असून, हवेत गारठा मोठया प्रमाणात वाढला आहे. ही थंडी 9 जानेवारीपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने नोंदवला आहे. याशिवाय राज्यात ढगाळ वातावरण असल्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

श्रीनगरमध्ये उणे 6.4 अंश तापमानाची नोंद – जम्मू-काश्मीरमध्ये यंदा कडाक्याची प्रचंड थंडी आहे. कडाक्याच्या थंडीने तलावातील व विहिरींतील पाण्याचेही बर्फात रुपांतर झाले आहे. श्रीनगरमध्ये उणे 6.4 अंश सेल्सिअस इतके कमी तापमान नोंदवले गेले आहे. तर दुसरीकडे येथील ऐतिहासिक दाल सरोवराचा काही भाग गोठला आहे. दरम्यान, जम्मूमधील काझीगुंड येथे उणे 6.2 आणि उत्तरेकडील कुपवाडामध्ये उणे 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

COMMENTS