Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र सुरूच

हिंगोलीत चिठ्ठी लिहून एका तरूणाने संपवले जीवन

हिंगोली ः मराठा आरक्षणासाठी सुनील कावळे या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना, दुसरीकडे हिंगोलीत देखील अशीच घटना घडली आहे. एका 23 वर्षीय

भाभा अणुसंशोधन केंद्रातील शास्त्रज्ञाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
2 सख्ख्या बहिणींनी गळफास लावला
भारताचा विश्वचषकात पराभव झाल्यामुळे तरुणाची आत्महत्या

हिंगोली ः मराठा आरक्षणासाठी सुनील कावळे या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना, दुसरीकडे हिंगोलीत देखील अशीच घटना घडली आहे. एका 23 वर्षीय तरुणाने चिठ्ठी लिहून गळफास घेत जीवनयात्रा संपवली आहे. नवनाथ उर्फ कृष्णा कल्याणकर असं मृत तरुणाचं नाव आहे. नवनाथ हा हिंगोलीच्या देवजना गावातील रहिवासी होता. त्याने बाळापूर आखाडा शिवारात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे.
दरम्यान, नवनाथने मराठा आरक्षणासाठीच आत्महत्या केली, असा दावा गावकर्‍यांकडून केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ कल्याणकर हा सोयाबीन काढण्यासाठी शेतात मळणी यंत्र घेऊन गेला होता. मजुरांना मळणी यंत्र सुरू करून दिल्यानंतर त्यान जवळच असलेल्या झाडाला गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली. मराठा आरक्षणासाठी मी आत्महत्या करीत आहे, असे नवनाथने चिठ्ठीत लिहून ठेवल्याचं गावकर्‍यांनी सांगितलं आहे. दरम्यान, नवनाथच्या आत्महत्येची बातमी कळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मराठा आरक्षणाचा विषय राज्यभर पेटला असतानाच आता त्या मागणीसाठी आत्महत्या करणार्‍यांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 7 दिवसांत 5 मराठा तरुणांनी आपले जीवन संपवले आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS