Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रहदारीस अडथळा केल्याप्रकरणी नऊ चालकांविरुध्द गुन्हा दाखल

गोंदवले / वार्ताहर : दहिवडी पोलिसांनी दहिवडी शहरात रहदारीस अडथळा करणार्‍या वाहनांवर आणि त्यांच्या चालकांवर धडक कारवाई करत नऊजणाविरुध्द सपोनि अक

दिल्ली विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी l DAINIK LOKMNTHAN
बनावट शस्त्र परवानाप्रकरणी ‘सीबीआय’चे 40 ठिकाणी छापे l DAINIK LOKMNTHAN
भामटे येथे तळ्यात बुडून सख्ख्या भावांचा मृत्यू

गोंदवले / वार्ताहर : दहिवडी पोलिसांनी दहिवडी शहरात रहदारीस अडथळा करणार्‍या वाहनांवर आणि त्यांच्या चालकांवर धडक कारवाई करत नऊजणाविरुध्द सपोनि अक्षय सोनवणे यांनी थेट गुन्हा दाखल केल्याने वाहन चालकांत मोठी खळबळ उडाली. गोंदवले आणि इतर ठिकाणी वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.
याबाबतची माहिती अशी, दहिवडी शहरात नेहमीच फलटण चौक, कर्मवीर पुतळा परिसर, एस. टी. स्टॅण्ड, मायणी चौक, मार्डी रानंदरोड, पंचायत समिती रस्ता, बाजार पटांगण या ठिकाणी वाहनांची नेहमी गर्दी असते. त्याच बरोबर अनेकदा वाहतुकीस अडथळा होईल, अशी वाहने सतत उभी केलेली असतात. सध्या दिपावलीच्या सुट्ट्या असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी सुरू आहे. त्यातच शहरात येऊन काही तर खरेदी करताना अनेकजण आपली वाहने रस्ताच्या कडेला इतर वाहतुकीला अडथळा होईल, अशी पार्किंग केलेली असतात. यामुळे अनेक वेळा मोठ्या प्रमाणत वाहतुकीची कोंडी होत होत होती. अशा वाहन चालकांवर पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारला. सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या रहदारीस व वाहतुकीस अडथळा होईल, अशा पध्दतीने वाहन उभे केल्याबद्दल फलटण चौकात चारचाकी चालक प्रवीण बबन बोराटे (रा. बिदाल), मार्डी चौकात शिवाजी पांडुरंग चव्हाण (रा. मार्डी) व दादा सुरेश राजगे (रा. शेवरी) यांच्यासह इतर नऊजणांविरोधात पोलीस नाईक तनुजा खाडे व हवालदार तुषार हांगे यांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस नाईक योगेश बागल, यशोदा मोरे व आर. एस. बनसोडे करत आहेत.

COMMENTS