Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीसांनी नियोजित सभा केल्या रद्द

अजितदादांच्या निधनानंतर घेतला निर्णय; स्थानिक नेत्यांकडे प्रचाराची जबाबदारीमुंबई ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने राज्यभर शोककळा पस

अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाच्या एक हजार 901 पदांच्या आकृतीबंधास मान्यता
मुख्यमंत्री फडणवीस दावोसकडे रवाना
मातोश्रीचे दरवाजे त्यांनी बंद केले : मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

अजितदादांच्या निधनानंतर घेतला निर्णय; स्थानिक नेत्यांकडे प्रचाराची जबाबदारी
मुंबई ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने राज्यभर शोककळा पसरली असून, राजकीय वर्तुळालाही याचा मोठा धक्का बसला आहे. या दुःखद पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक संवेदनशील आणि महत्त्वाचा राजकीय निर्णय घेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील स्वतःचा थेट प्रचार रद्द केला आहे. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांनी नियोजित असलेल्या सर्व प्रचारसभा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी होणार्‍या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सात दिवसांत 22 प्रचारसभांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, सहकारी नेत्याच्या निधनाने निर्माण झालेल्या शोकमय वातावरणाचा आदर राखत आणि वैयक्तिक दुःख लक्षात घेऊन त्यांनी प्रचारापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. आता या निवडणुकीतील प्रचाराची धुरा स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडे सोपवण्यात आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेत बदल करत मतदानाची तारीख पुढे ढकलली आहे. पूर्वी 5 फेब्रुवारी रोजी होणारे मतदान आता 7 फेब्रुवारीला पार पडणार आहे. उमेदवारांना 5 फेब्रुवारीपर्यंत प्रचाराची मुदत देण्यात आली असून, मतमोजणी नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘देवगिरी’ निवासस्थानी भेट देत त्यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पवार कुटुंबास कठीण काळात महायुती सरकार ठामपणे पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली.

COMMENTS