Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात उद्यापासून दोन दिवस पावसाचा इशारा

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात उन्हाचा उकाडा असह्य होत असतांना, दुसरीकडे हवामान विभागाने उद्यापासून दोन दिवस पावसांचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे एकीकड

वानखेडेंना हाताशी घेऊन या कारवाया केल्या जात आहे – नाना पटोले (Video)
तुर्कीसह चार देशात भूकंपाचा हाहाकार  
पद्म चे छद्म अर्थात नक्षलवादी कंगणा!

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात उन्हाचा उकाडा असह्य होत असतांना, दुसरीकडे हवामान विभागाने उद्यापासून दोन दिवस पावसांचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे एकीकडे असह्य होणारा कडक उन्हाळा तर दुसरीकडे पावसाचा शिडकावा राज्यातील जनतेला अनुभवायला मिळणार आहे.  आसाम व ओडीशा किनारपट्टी जवळ वार्‍याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने देशातील बहुतांश भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
तामिळनाडू ते ओडीशापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तसेच आंध्र प्रदेश किनारपट्टी जवळ जोरदार चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे वाढलेले तापमान पुन्हा कमी झाले. हिमालयासह मैदानी भागात आगामी 24 ते 48 तासांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 3 दिवसांत पश्‍चिम हिमालयीन प्रदेशात वादळी वार्‍यासह गडगडाटी पाऊस होईल. पुढील 24 तासांत पूर्व अरुणाचल प्रदेश आणि ईशान्य आसाममध्ये गारपीट होईल. मध्य भारतात पुढील पाच दिवसांत विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये हलका पाऊस पडेल. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 5 दिवसांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात दोन दिवसांसाठी येलो अलर्ट – राज्यात उद्या 6 एप्रिलपासून कोकणात, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात 8 एप्रिलपर्यंत येलो अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व भागात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकणात सहा, तर उर्वरित राज्याला आठ एप्रिलपर्यंत येलो अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

COMMENTS