Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘जीपीएस’ लावून प्रियसीचा पाठलाग

पुणे : एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या नकळत तिच्या दुचाकीला जीपीएस यंत्र लावून तिचा पाठलाग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विश्रामब

पाथरवट समाज सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. अनिकेत गगे
नगरच्या स्वामी समर्थ मठात उद्यापासून धार्मिक उपक्रम
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी एनएसएस कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरेल : मंत्री उदय सामंत

पुणे : एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या नकळत तिच्या दुचाकीला जीपीएस यंत्र लावून तिचा पाठलाग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी बारामतीतील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लखन महादेव भिसे (वय 25 रा. पिंपळी, ता. बारामती, जि. पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. या बाबत एका तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार शुक्रवार पेठेतील एका सोसायटीत राहायला आहे. आरोपी भिसे तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. त्याने तरुणीवर पाळत ठेवण्यासाठी तिच्या नकळत दुचाकीला जीपीएस यंत्र लावले. तरुणीवर तो पाळत ठेवत होता. तिचा चोरून पाठलाग करायचा. तरुणीच्या लक्षात हा प्रकार आला. तेव्हा तिने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक स्वाती भोरड तपास करत आहेत.

COMMENTS