Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुढेपाचगणी पठारावरील डोंगर पेटले की पेटवले? ; आगीत चार्‍यासह सरपटणारे प्राणी भस्म

शिराळा / प्रतिनिधी : अचानक लागलेल्या आगी मुळे गुढे-पाचगणी पठारासह शेजारील गावातील 10 हजार एकर पेक्षा जास्त क्षेत्र जळून खाक झाल्याने या ठिकाणची स

विक्रमी ऊस उत्पादन देणारे सर्व वाण राहुरी कृषि विद्यापीठाचे
शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळणार, महावितरण आणि राज्य शासनाने आणली योजना 
शिराळा तालुक्यातील चांदोली धरण शनिवारपासून पर्यटकांसाठी खुले

शिराळा / प्रतिनिधी : अचानक लागलेल्या आगी मुळे गुढे-पाचगणी पठारासह शेजारील गावातील 10 हजार एकर पेक्षा जास्त क्षेत्र जळून खाक झाल्याने या ठिकाणची सर्व झाडे-झुडपे, गवत, चार्‍यासह शेकडो सरपटणारे प्राणी जळून खाक झाले आहे. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गुढे, पाचगणी, मानेवाडी, बांबरवाडी या पठारावरील पाचगणी येथील गवत पठारास मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास अचानक आग लागली. डोंगर-पठारावर वार्‍याचा वेग जास्त असल्याने ही आग तीन किलोमीटर परिसरातील पाचगणीसह, मानेवाडी, गुढे, बांबरवाडी, पणूंब्रे, ढाणकेवाडी, चरण, येळापूर, शिरसटवाडी, खटींगवाडी, माळवाडी, सावंतवाडी, रांजणवाडी, बेंगडेवाडी, मेणी, आटूगडेवाडी तसेच कराड तालुक्यातील लोहारवाडी, भरेवाडी, भुरभुशी, येळगाव परिसरातील 10 हजार एकर पेक्षा जास्त क्षेत्रातील गवत चारा, झाडे-झुडपे जळून खाक झाली आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी असलेले सर्व प्रकारचे सरपटणारे प्राणी होरपळून गेले आहेत. अनेक शेतकर्‍यांनी अजून गवत काढणी केली नव्हती. तसेच काहींनी गवत कापून डोंगरात गवताच्या गंजी रचून ठेवल्या होत्या. काही शेतकर्‍यांनी फळबाग लागवड तसेच नव्याने झाडे लावली होती. तीही जळून गेल्याने शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पाचगणी, शिरसटवाडी, सावंतवाडी, बेंगडेवाडीसह परिसरातील मोठ्या संख्याने आलेल्या युवकांनी हातातील ओल्या ढाळ्याने आग विजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी वेळीच काळजी घेतल्याने या कार्यालयामार्फत उभारण्यात आलेल्या 50 एकरातील मोठमोठी झाडे-झुडपे वाचल्याने मोठे नुकसान टळले. दरवर्षी पश्‍चिम भागातील डोंगर पेटलेले असतात. ते पेटतात की पेटवले जातात याचा अद्याप तपास लागला नसला तरी काहीजण पुढच्या चांगल्या गवताची वाढ होण्यासाठी मुद्दाम पेटवत असल्याची चर्चा आहे. मात्र, हजारो एकर पठार, डोंगर, दर्‍या जळून गेल्याने झाडे-झुडपासह लहान-मोठे जीव जंतू जळून खाक होत आहेत.

COMMENTS