बीड : छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य थाईबॉक्सिंग स्पर्धा 2026 मध्ये देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी इंग्लिश स्कूल

बीड : छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य थाईबॉक्सिंग स्पर्धा 2026 मध्ये देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी इंग्लिश स्कूल, बीडच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान कामगिरी केली. या स्पर्धेत शाळेच्या खेळाडूंनी एक सुवर्ण आणि दोन रौप्यपदके पटकावत शाळेच्या व जिल्ह्याच्या क्रीडा वैभवात भर घातली आहे. विशेष म्हणजे, या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर विजेत्या विद्यार्थ्यांची ऑगस्ट 2026 मध्ये नांदेड येथे होणार्या राष्ट्रीय थाईबॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे.
दिनांक 25 व 26 जुलै रोजी पार पडलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातील अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यांमध्ये राजवर्धन जगन्नाथ चव्हाण याने सुवर्णपदक पटकावले, तर आकाश अविनाश जाधव आणि हर्षद महादेव शिरसाट यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर रौप्यपदकावर नाव कोरले. राज्यस्तरीय स्पर्धेतील उल्लेखनीय यशाच्या बळावर या खेळाडूंची ऑगस्ट 2026 मध्ये नांदेड येथे होणार्या राष्ट्रीय थाईबॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी निवड झाल्याने शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राष्ट्रीय स्पर्धेतही हे खेळाडू उल्लेखनीय यश संपादन करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे व प्राचार्या उमा जगतकर यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक मोसिम शेख यांचे विशेष कौतुक करण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचार्यांनीही खेळाडूंचे अभिनंदन करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS