Homeताज्या बातम्या

सियाने एक कोटी केतनकडून घेऊन चेतनला दिलेकॅब चालकाचा दावा; पासपोर्ट लपवून परदेश प्रवास टाळण्याचा प्रयत्न?

पुणे :पुण्यातील केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात तपासादरम्यान नवनवीन दावे समोर येत असून, आर्थिक व्यवहार आणि नियोजित परदेश प्रवासाबाबत महत्त्वाची माहित

मुंबई विमानतळावरून 5 कोटीचे सोने जप्तराजकीय पदाधिकार्‍यासह पाच जण ताब्यर्चीं
सुयोग किड्झ अँड इंटरनॅशनल च्या विद्यार्थ्यांची भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेला भेट
देहविक्रीप्रकरणी मराठी अभिनेत्रीची सुटका


पुणे :पुण्यातील केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात तपासादरम्यान नवनवीन दावे समोर येत असून, आर्थिक व्यवहार आणि नियोजित परदेश प्रवासाबाबत महत्त्वाची माहिती उघड होत आहे. तपास यंत्रणांकडून या सर्व बाबींची सखोल पडताळणी सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सियाने विवाहासाठी खरेदी करण्याच्या कारणावरून केतनकडून एक कोटी रुपयांची रक्कम घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, ही रक्कम खरेदीसाठी न वापरता ती चेतन चौधरी याच्याकडे दिल्याचा आरोप तपासात पुढे आला आहे. या दाव्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
सहा जून रोजी नियोजित परदेश प्रवासासाठी संबंधितांना विमानतळावर सोडणार्‍या वैभव जाधव या वाहनचालकाने काही महत्त्वाचे दावे केले आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार, सियाची परदेशात जाण्याची इच्छा नव्हती आणि प्रवासादरम्यान तिचे व तिचा भाऊ साहिल यांच्यात सतत वाद सुरू होता. रस्त्यात वाहन थांबवल्यानंतर सियाने काही सामान काढून ते वाहनाच्या डिक्कीत लपवून ठेवल्याचेही त्याने सांगितले. विमानतळावर सर्वांना सोडल्यानंतर वाहनात एक पासपोर्ट राहिल्याची माहिती त्याला देण्यात आली. पुढील तपासात हा पासपोर्ट जाणूनबुजून लपविण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या घटनेमागील नेमकी कारणे शोधण्याचे काम सुरू आहे. तपास अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, चेतन चौधरीने लोहगड किल्ल्यापर्यंत सुमारे नव्वद किलोमीटरचा प्रवास दुचाकीवरून केला. वाहन कर नोंदीत आपला मागोवा लागू नये, या उद्देशाने चारचाकी वाहनाचा वापर टाळल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS