Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोदी आवास योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांना लाभ मिळवून द्या -: मंत्री छगन भुजबळ

नाशिक - केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील इतर मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी ‘मोदी आवास’ योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये स

मंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी
लासलगाव विंचूरसह १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या फिल्टरेशन प्लँटची मंत्री छगन भुजबळ यांनी केली पाहणी
कलाग्रामच्या माध्यमातून महिला बचतगटांच्या उत्पादन विक्रीसाठी हक्काचे स्टॉल्स उपलब्ध करून देणार-: मंत्री छगन भुजबळ

नाशिक – केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील इतर मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी ‘मोदी आवास’ योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये सन २०२३ -२४ मध्ये नाशिक जिल्ह्यात सुमारे ३५ हजार घरकुल निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. तसेच इतर मागास प्रवर्गातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.

केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील इतर मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी राज्यात ‘मोदी आवास’ योजना राबविण्यात येत आहे. योजनेसाठी १२ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. प्रतिवर्ष ३ लाख घरे बांधण्यात येणार आहे. आज नाशिक येथील कार्यालयात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांसमवेत या योजनेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील याद्यांची पडताळणी करून याद्या त्वरीत अद्ययावत कराव्यात. या योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करून पात्र नागरिकांना घरकुलांचा लाभ मिळवून देण्यात यावा अशा सूचना सबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

COMMENTS