Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महामंडळाच्या बसेस मध्ये हायतोबा गर्दी ! किमान १०० च्या वर प्रवासी  

नाशिक - त्र्यंबकेश्वर - जव्हार - प्रवाशांची उडतेय झोप

नाशिक प्रतिनिधी - राज्यातील महत्वाचा आणि महसूल जमा होण्याचा नाशिक जिल्हा प्रसिद्ध आहेत। नाशिक येथे एस.टी. महामंडळाचे मोठे आगार , डेपो तसेच विभाग

भिंगारच्या जुगार अड्ड्यावर छापा, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
अनिल पावटे यांना उत्कृष्ट अध्यापन व साहित्य सेवा पुरस्कार
निलेश राणेंना ही हुज्जत पडली माघात पाहा पूर्ण व्हिडीओ | LOKNews24

नाशिक प्रतिनिधी – राज्यातील महत्वाचा आणि महसूल जमा होण्याचा नाशिक जिल्हा प्रसिद्ध आहेत। नाशिक येथे एस.टी. महामंडळाचे मोठे आगार , डेपो तसेच विभागीय कार्यालय नाशिक येथे आहेत. नाशिक शहरातून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात तसेच राज्याबाहेर जाणाऱ्या बसेस ह्या नाशिकमधून सुटतात.मात्र  कोरोना नंतर महामंडळाच्या बसेस ह्या खिळखिळ्या होतांना दिसत आहेत. राज्यसरकारने एका बाजूला स्कीम देऊन प्रवाशी वळवले मात्र त्यास एस.टी. महामंडळ प्रतिसाद देताना दिसत नाहीत। दै।लोकमंथन ची टीम यांच्या निदर्शनास आलेल्या काही ठराविक ठिकाणी  छायाचित्रे घेतली तेव्हा विचित्र व गंभीर परिस्थिती समोर दिसली.  त्र्यम्बकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने भारतभरातून प्रवासी नाशिक येथे मुक्कामी येऊन पहाटे ३ वाजेपासूनच आपल्या प्रवासाची तयारी करतात। 

नाशिक मधून सेलवास  – जव्हार कडे जाणाऱ्या बसेस ह्या किमान १०० च्या वर प्रवासी घेऊन जातात. ड्रायव्हर च्या केबिन पासून ते शेवटच्या शिटापर्यंत ही हायतोबा गर्दी गेल्या जून महिन्यापासून दिसून येत आहेत।  परिसरातून नोकरी निमित्त जव्हार कडे सकाळी साडेपाच च्या दरम्यान वा आठ वाजेच्या दरम्यान कर्मचारी तसेच प्रवासी जात असतात. पुढे घाट रस्ता असतांना देखील महामंडळ कसे सुस्त आहेत हे ह्यावरून स्पष्ट होते. किमान ह्या वेळेत ज्यादा बसेस १० मिनिटाच्या अंतराने सोडल्यास सर्वच प्रवाशी तसेच महामंडळाचे कर्मचारी देखील सुटकेचा निःश्वास टाकतील.अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहेत. 

COMMENTS