Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दोन टप्प्यात 50 हजार शिक्षकांची भरती

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

मुंबई/प्रतिनिधी : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीला वेग आला असून, पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे तर दुसर्‍

विद्यार्थ्यांना कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण देणार – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर 
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या बाईला तुम्ही शिवसेनेत स्थान दिलं हे दुर्दैवी 
विद्यार्थ्यांच्या संकल्पनांना व्यासपीठ मिळावे यासाठी प्रयत्न करावा

मुंबई/प्रतिनिधी : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीला वेग आला असून, पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे तर दुसर्‍या टप्प्यात जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

आधार व्हेरिफिकेशन विद्यार्थ्यांचे पूर्ण झाल्यानंतर दुसर्‍या टप्प्यातील शिक्षक भरती संदर्भात आकडा कळेल, असेही त्यांनी त्यांनी म्हटले. शिक्षक भरती संदर्भात केसरकर म्हणाले की, नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच ही शिक्षक भरती करण्याचा आमचा विचार आहे. पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे तर दुसर्‍या टप्प्यात जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल. आधार व्हेरिफिकेशन विद्यार्थ्यांचे पूर्ण झाल्यानंतर दुसर्‍या टप्प्यातील शिक्षक भरती संदर्भात आकडा कळेल. शंभर टक्के शिक्षक भरती होणार आहे. त्यासाठी संच मान्यता झाली पाहिजे. कारण आरक्षणानुसार ही पद भरती होईल. या उमेदवारांच्या मुलाखती होऊन त्यांची भरती केली जाईल. शिक्षकांच्या बदलीसंदर्भात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे देखील केसरकर यांनी सांगितले. माध्यमिक शिक्षकांनुसार प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या सुद्धा रद्द करता येतील का? जेणेकरुन शिक्षक स्थिर होतील, याबाबत महाजन यांच्यासोबत चर्चा केली जाईल. तसेच प्रत्येक शिक्षकाला आपल्या गावातच पोस्टिंग मिळेल असे नाही, मात्र जवळच्या गावात पोस्टिंग देता येईल, असे केसरकर यांनी म्हटले आहे. शिक्षकांची बदली झाली नाही तर एक जबाबदारीची जाणीव शिक्षकांमध्ये असते. एखादा शिक्षक अजिबात चांगला शिकवत नसेल तर त्याच्या संदर्भात वेगळे निर्णय घ्यावे लागतील. आतापर्यंतच्या शिक्षकांची शिक्षा म्हणून बदली करावी लागायची. आता बदली न करता त्या शिक्षकांना ट्रेनिंग द्यावी लागेल, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

एकच गणवेशाबाबत लवकरच निर्णय घेणार – विद्यार्थ्यांच्या एकच गणवेश देण्याबाबतचा निर्णय यावर्षी घ्यायचा की, पुढल्या वर्षी घ्यायचा या संदर्भात एक ते दोन दिवसात विचार करु आणि त्यानंतर ठरवले जाईल, असे दीपक केसरकर यांनी स्षष्ट केले. ऑर्डर दिलेली नाही किंवा कुठल्याही प्रकारे पैसे ट्रान्सफर केलेले नाहीत. स्वतःचे अधिकार वापरुन ज्यांनी आधीच युनिफॉर्म संदर्भात ऑर्डर दिलेली आहेत त्यांनी बैठकीसाठी विचारणा केली आहे. यामध्ये महिला बचत गटांना काम मिळवून देण्याचे शासनाचे धोरण आहे. स्काऊट गाईड, एनएसएस हे अनिवार्य करणार आहोत. त्यांना एक विशेष गणवेश दिला तर गणवेशाचा डबल खर्च होणार नाही. बूट सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना देणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले. 

COMMENTS