विधान परिषद निवडणुकीत भाजपचे बावनकुळे विजयी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधान परिषद निवडणुकीत भाजपचे बावनकुळे विजयी

नागपूर : नागपूर विधान परिषद निवडणुकीत नाट्यमय घडामोडीनंतर भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना 36

जरांगे पाटील यांच्या निर्णयाने गरीब मराठा तरूणांचे भवितव्य अधांतरी!
पशुपालकांनी लम्पी पासून सुरक्षिततेसाठी आजारी पशू विलगीकरणासह लसीकरण आवश्यक- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
चीनचा संवाद की वितंडवाद

नागपूर : नागपूर विधान परिषद निवडणुकीत नाट्यमय घडामोडीनंतर भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाली आहेत. त्यांनी या निवडणुकीत तब्बल 176 मतांनी विजय मिळवला आहे. विधान परिषदेच्या नागपूर येथील जागेवर चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे रविंद्र भोयर यांना एका मतावर समाधान मानावे लागलेय. काँग्रेसने मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना उमेदवार बदलल्याने त्याचा फटका काँग्रेसला बसला आहे. मतमोजणीत 549 मते वैध ठरली. विजयी उमेदवारासाठी 275 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना 362, रवींद्र भोयर यांना 1, मंगेश देशमुख यांना 186 मते प्राप्त झाली.महाविकास आघाडीची 16 मते फुटली तर भाजपला 44 अतिरिक्त मते मिळाली

COMMENTS