Homeताज्या बातम्यामनोरंजन

बिग बॉस फेम अब्दू अडचणीत

मुंबई : ‘बिग बॉस 16’ फेम अब्दु रोझिक कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. बिग बॉसनंतर अब्दुच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली आहे. सोश

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन
आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल
लसीकरण नसेल तर… पगार नाही, प्रवेश नाही !

मुंबई : ‘बिग बॉस 16’ फेम अब्दु रोझिक कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. बिग बॉसनंतर अब्दुच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडियावर देखील अब्दुचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकताच अब्दु याने मुंबई येथील अंधेरी याठिकाणी स्वतःचा हॉटेल सुरु केला आहे.अब्दुच्या हॉटेलमध्ये फराह खान, सोनू सूद, अर्चना गौतम आणि साजिद खान यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. पण आता अब्दु वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सध्या अब्दुचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अब्दु बंदूक लोड करताना दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवाय मुंबई पोलिसांत देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे. गोल्डन बॉईजच्या बॉडीगार्डनी अब्दू रोजिकच्या हातात बंदूक दिली होती. गोल्डन बॉईज सनी नानासाहेब वाघचोरे आणि सनी गुर्जर हे देखील अब्दु रोजिकच्या रेस्टॉरंटमध्ये आले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या बॉडीगार्डने ही बंदूक अब्दू रोजिकला दिली होती. बॉडीगार्डकडे पिस्तूल ठेवण्याचा परवाना असला तरी. मात्र अब्दू रोजिकच्या हातात पिस्तूल पाहून लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. एवढंच नाही तर, जर त्याठिकाणी उपस्थित असलेल्यांपैकी कोणाला गोळी लागली असती तर… असं देखील पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलं आहे.. महत्त्वाचं म्हणजे ओशिवरा येथील अब्दुच्या रेस्टॉरंटमध्ये अनेक सेलेब्स उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अब्दु विरोधात तक्रार दाखल केली आहे.

COMMENTS