28 बँकाची 22 हजार कोटींची फसवणूक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

28 बँकाची 22 हजार कोटींची फसवणूक

मुंबई, पुणेसह सुरतमध्ये ‘ईडी’चे एबीजी शिपयार्डवर छापे

मुंबई : देशातील सर्वात मोठा तब्बल 22 हजार कोटींचा बँक घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने एबीजी शिपयार्डच्या मुंबई, पुणे आणि सूरतमधील जवळ

मोठी घडामोड… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला… युतीबाबत…?
प्रभाग कार्यालयात भाजपाने उघडले नागरीकांच्या समस्यांचे गाठोडे
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द

मुंबई : देशातील सर्वात मोठा तब्बल 22 हजार कोटींचा बँक घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने एबीजी शिपयार्डच्या मुंबई, पुणे आणि सूरतमधील जवळपास 24 कार्यालयांवर आणि संचालकांच्या निवासस्थानी छापे टाकले आहेेत. कर्जासंबधीच्या महत्वाच्या दस्तांचा तपास केला जात असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
मनी लाँडरिंगसंबधीच्या ’पीएमएलए’ कायद्याअंतर्गत ईडीकडून ही तपास मोहीम हाती घेण्यात आली आहे. यापूर्वी ’सीबीआय’ने फेब्रुवारी महिन्यात बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी एबीजी शिपयार्ड लिमिटेडचे तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आज ईडीकडून 24 ठिकाणी तपास केला जात आहे. यात ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह इतर संचालकांच्या घरी देखील तपास पथके पोहोचली असून तपास केला जात असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. देशातील बँकिंग क्षेत्रातील आजवरचा हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे बोलले जाते. एबीजी शिपयार्डने 28 बँकांची तब्बल 22 हजार 842 कोटींची फसवणूक केली. ज्यात स्टेट बँकेकडून 2 हजार 925 कोटी, आयसीआयसीआय बँकेकडून 7 हजार 89 कोटी, आयडीबीआय बँकेकडून 3 हजार 634 कोटी, बँक ऑफ बडोदाकडून 1 हजार 614 कोटी, पीएनबीकडून 1 हजार 244 कोटी आणि आयओबीकडून 1 हजार 228 कोटी इतके कर्ज एबीजी शिपयार्डने घेतले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया च्या नेतृत्वाखालील बँकांच्या संघाकडून 22,842 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीच्या संदर्भात नुकताच खटला दाखल करण्यात आला. सीबीआयने एबीजी शिपयार्ड लिमिटेड आणि कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने एबीजी शिपयार्ड कंपनी तसेच कंपनीच्या संचालकांविरुद्ध लुकआउट सर्क्युलर जारी केले होते. एबीजी शिपयार्ड ही एबीजी ग्रुपची प्रमुख कंपनी आहे. गुजरातमधील दहेज आणि सुरत येथे या कंपनीचे प्रमुख प्लांट आहेत. कंपनीने स्टेट बँक ऑफ इंडिया सह देशातील 28 बड्या बँकांना तब्बल 22 हजार 842 कोटींचा गंडा घातला आहे. या कंपनीने कर्ज स्वरूपात घेतलेली रक्कम अन्यत्र वळवल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

काय आहे प्रकरण?
बँकिंग क्षेत्रात खळबळ उडवून देणारा सर्वात मोठा घोटाळा उघड झाला आहे. एबीजी शिपयार्ड या कंपनीने देशातील आघाडीच्या 28 बँकांची तब्बल 22 हजार 842 कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सबळ पुरावे हाती येताच सीबीआयने कारवाई सुरू केली आहे. एप्रिल 2012 ते जुलै 2017 दरम्यान हा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी कंपनीच्या तत्कालीन तीन संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल झालेत. एबीजी शिपयार्ड ही एबीजी समूहातील प्रमुख कंपनी असून जहाज बांधणी आणि जहाजांची दुरुस्ती यात ही आघाडीची कंपनी मानली जाते. गुजरातमधील सुरत आणि दहेज येथे या कंपनीचे प्लांट असून कंपनीच्या संचालकांनी तब्बल 28 बँकांची फसवणूक केल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. एबीजी शिपयार्डचे तत्कालीन संचालक ऋषी अग्रवाल, संथनम मुथुस्वामी आणि अश्‍विनी अग्रवाल या तिघांसह कंपनीविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS