श्रीलंकेत राजकीय नेत्यांची घरे जाळून नागरिकांचा संताप

Homeताज्या बातम्यादेश

श्रीलंकेत राजकीय नेत्यांची घरे जाळून नागरिकांचा संताप

कोलंबो/वृत्तसंस्था : श्रीलंका या देश सध्या सर्वात मोठया आर्थिक संकटाला तोंड देत असतांना, तेथील सरकार देखील परिस्थिती हाताळण्यास असमर्थ ठरत असतांना, श

डॉ. शशांक कुलकर्णी नीती आयोगाचे कृषी सल्लागार
संप मागे घेण्याचे न्यायालयाचे आदेश
वानखेडेंच्या बाबतीत भाजपाने एवढे गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही – जयंत पाटील (Video)

कोलंबो/वृत्तसंस्था : श्रीलंका या देश सध्या सर्वात मोठया आर्थिक संकटाला तोंड देत असतांना, तेथील सरकार देखील परिस्थिती हाताळण्यास असमर्थ ठरत असतांना, श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर तेथील परिस्थिती आणखी चिघळली आहे. सरकारविरोधी निदर्शकांनी राजपक्षे यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री सनथ निशांत यांच्या घराला आग लावली.
या हिंसाचारात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून, हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांनी घातलेल्या धुडगूसमध्ेय सरकारविरोधी निदर्शने करणार्‍यांना मारहाण केल्याची देखील घटना घडली आहे. हिंसाचार भडकवल्याप्रकरणी महिंदा राजपक्षे यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. महिंदा राजपक्षे यांच्या समर्थक आणि सरकारविरोधी निदर्शकांमध्ये चकमक झाली. ज्यांनी श्रीलंकेला सर्वात वाईट आर्थिक संकट आणून ठेवले आहे. त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी जनतेने केली आहे.

COMMENTS