Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतीय नरहरी सेनेची बैठक उत्साहात

राहुरी ः भारतीय नरहरी सेनेची महत्त्वपूर्ण बैठक व पद नियुक्ती सोहळा लोणी येथे सोनार समाजाचे जेष्ठ बांधव मेजर शेवंते काका यांचे निवासस्थानी  संपन्न

नगरच्या शिक्षणाधिकारी, कक्ष अधिकार्‍यांवर कारवाई होईल का ?
कोरेगावचा लुटारू अखेर कर्जत पोलिसांकडून जेरबंद
अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्‍यांना तातडीने शिक्षा देण्याचा स्वतंत्र कायदा करावा – बाळासाहेब सानप

राहुरी ः भारतीय नरहरी सेनेची महत्त्वपूर्ण बैठक व पद नियुक्ती सोहळा लोणी येथे सोनार समाजाचे जेष्ठ बांधव मेजर शेवंते काका यांचे निवासस्थानी  संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरवातीस संत नरहरीमहाराज सोनार यांच्या प्रतीमेच पुजन मान्यवरांनी करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात श्री संत नरहरीमहाराज सोनार यांचा प्रचार व प्रसार तळागाळापर्यंत पोहोचविण्यास सर्व शाखीय सोनार समाजाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन उपस्थितांना करून संत नरहरीमहाराज सोनार यांच्या नियोजीत स्मारकाबाबत संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बुराडे यांनी विस्तृत माहीती दिली. यावेळी भारतीय नरहरी  सेनेचे नुतन सरचिटणीस रवीशंकरजी धर्माधिकारी, युवती प्रदेश तथा स्मारक समिती अध्यक्ष श्रीमती सारिकाताई नागरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य उमेशजी बुराडे, बारामती तालुका अध्यक्ष गणेशशेठ बनछोड, उत्तर महाराष्ट्र प्रमुख उदयदादा महाले, प्रसिद्धीप्रमुख रविभाऊ माळवे, चंचला काकासाहेब बुराडे उपस्थित होते. कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला, सर्वप्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, संघटनेचे उद्दिष्ट पदाधिकार्‍यांना समजावून सांगितले. संघटन कसे वाढवावे व संघटनेमध्ये कार्य कोणत्या पद्धतीने कसे व्हावे यावर संबोधित करण्यात आले. या प्रसंगी अशोक मैड, रविन्द्र मैड, विजय मैड, उदय महाले, शेवंते, सिद्धांत मिसाळ, संतोष माळवे, दत्तात्रेय मैड, सोमनाथ लोळगे, निताताई उदावंत, अर्चना ताई लोळगे, रविन्द्र माळवे, श्रीपाद बोकंद, गणेश मैड, मदन उदावंत, अशोक लोळगे, ज्ञानेश्‍वर साबळे, सोमनाथ आहेर, अभिजीत साबळे, साई साबळे आदी समाज बांधव व भगिनी व इतर समाज बांधवांनी कार्यक्रमास उपस्थिती होती.

COMMENTS