https://www.youtube.com/watch?v=qNae6buh7N4 मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मराठी भाषेचं व्
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मराठी भाषेचं व्यवहारिक ज्ञान नसल्यास चालकाच्या परवान्यावर कारवाई होणार आहे.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठी येत नसलेल्या चालकाला आधी एक महिन्याची मुदत दिली जाणार आहे. या काळातही मराठी शिकली नाही, तर संबंधित परवान्यावरील अधिकृतता तीन महिन्यांसाठी निलंबित केली जाऊ शकते. त्यानंतरही नियमांचं सातत्याने उल्लंघन केल्यास परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, ॲपवर चालणाऱ्या कॅबच्या चालकांसोबतच काही परमिटधारकांसाठीही व्यवहारिक मराठीची अट लागू करण्यात आली आहे.‘मग्रुरी मोडून काढणार’, असा इशाराही प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठीचं ज्ञान अनिवार्य होणार का, आणि या नियमाची अंमलबजावणी कशी होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS