Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेकणुर येथे गोवंश तस्करीचा प्रयत्न उघड; स्था. गु. शाखेचा छापा, 11 गायींची सुटका

बीड : नेकणुर परिसरात कत्तलीसाठी साठवून ठेवलेल्या गोवंश जातीच्या 11 गायींवर स्था. गु. शाखेने छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अंदाजे 3 ल

चोरीची अल्युमिनियम तार घेऊन जाणारा आयशर टेम्पो पकडला; साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्तस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
शेवगावमध्ये महिलांना चाकूच्या धाकावर लुटण्याचे प्रयत्न; कारवाईची मागणी; नागरिकांचे पोलिसांना निवेदन
संभाजीनगरमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणीची भरदिवसा हत्या
Beed Crime: बीडच्या नेकनूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्रीत चार ठिकाणी  घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास Beed Crime Four thefts in one night in Neknur police  Station area

बीड :
नेकणुर परिसरात कत्तलीसाठी साठवून ठेवलेल्या गोवंश जातीच्या 11 गायींवर स्था. गु. शाखेने छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अंदाजे 3 लाख 15 हजार रुपये किमतीच्या गायींची सुटका करण्यात आली असून संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मा. पोलीस अधीक्षक बीड यांनी दिले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, स्था. गु. शाखा बीड यांनी सर्व पथक प्रमुखांना कारवाईचे निर्देश दिले होते. दि. 10/04/2026 रोजी पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने हे पथकासह केज उपविभागातील नेकणुर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. कळसंबर रोड, गंडाळा परिसर, नेकणुर येथे आरबाज जलाल पठाण (रा. नेकणुर) याने पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जातीच्या गायी कत्तलीसाठी साठवून ठेवल्या असून त्या आज रात्री कत्तलखान्यात पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ पंचासह संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यात गोवंश जातीच्या विविध रंगांच्या 11 गायी आढळून आल्या. या गायी अत्यंत दाटीवाटीने, लाकडी खांबाला छोट्या दोरीने बांधलेल्या अवस्थेत होत्या. तसेच त्यांना चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. पथकाने सर्व 11 गायी ताब्यात घेऊन जप्त केल्या असून त्यांची किंमत अंदाजे 3,15,000 रुपये इतकी आहे. याप्रकरणी आरोपी आरबाज जलाल पठाण याच्याविरुद्ध नेकणुर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 142/2026 नोंदवण्यात आला आहे. त्याच्यावर महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या सर्व गायी बीड येथील कै. तुकाराम गुरुजी गौधाम प्रकल्प येथे सुरक्षितरीत्या पाठवण्यात आल्या आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोहवा महेश जोगदंड, जफर पठाण, दिलीप गित्ते आणि चापोहवा गणेश मराडे यांच्या पथकाने केली.

COMMENTS