Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महेश्‍वर यात्रेनिमित्त कोळपेवाडी भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज

कोपरगाव ः चैत्र पाडव्या च्या शुभ मुहूर्तावर महेश्‍वराच्या यात्रेनिमित्त कोळपेवाडी पंचक्रोशी भाविकाच्या स्वागतासाठी सज्ज झाली असुन विद्युत रोषणाई

कुंकूलोळ कुटुंबियांनी उभारले स्वखर्चातून बस निवारा शेड
एमआयडीसी येथील कंपनीत तरुणीचा विनयभंग करुन मारहाण
पोलीस इलेव्हन शिरूर ठरले कर्जतच्या पैलवान चषकाचे मानकरी

कोपरगाव ः चैत्र पाडव्या च्या शुभ मुहूर्तावर महेश्‍वराच्या यात्रेनिमित्त कोळपेवाडी पंचक्रोशी भाविकाच्या स्वागतासाठी सज्ज झाली असुन विद्युत रोषणाई भाविकांचे लक्ष वेधुन घेत आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्वात मोठ्या व पंचक्रोशीचे आराध्यदैवत महेश्‍वर महाराज यात्रे निमित्त कोळपेवाडी नगरी भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली असुन मंदिरावर करण्यात आलेली विद्युत रोषनाई भाविकाचे लक्ष वेधुन घेत आहे. मंदिराचा नुकताच तिर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश झाल्याने ग्रामस्थांचा उत्साह द्विगुणित होवून यात्रा कमेटिने केलेले सुयोग्य नियोजन भाविकांना सुखद अनुभुती देणार आहे.
सकाळी गंगा गोदावरी च्या पाण्याने वाजत गाजत महेश्‍वरास स्नान घालून यात्रेची सुरुवात होवुन सांयकाळी देवाचे भगत म्हताबाबा कोळपे हे भाविकांनी भरलेल्या बारा गाड्या ओढतात तेव्हा दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. तकतरावाचा प्रथम मान पूर्वापार पासून शहाजापुर गावास आहे  कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना सिजन चालू असल्याने भाविकांच्या गर्दी मध्ये वाढ होणार आहे खाऊगल्ली खेळणी रहाट पाळणे प्रसादाचे साहित्य मनोरंजनासाठी आर्केस्टा तमाशा पाडवा पहाट भक्ती गिते बैलगाडा शर्यत नामवंत मल्लाच्या कुस्ती स्पर्धा अशा कार्यक्रमाची रैलचेल असणार आहे यात्रा काळात कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन चे निरीक्षक संदिप कोळी यांच्या देखरेखी खाली ग्रामीण पोलीस चोख बंदोबस्त बजावनार असुन कुठलाही गैर प्रकार खपवुन घेतला जानार नसल्याची तंबी हौशा नवशा गवशाना देत मागिल यात्रेत कुरापती काढणार्या वर विशेष लक्ष देत अवैध धंदे बंद राहण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन यात्रा नियोजन बैठकीत कोळी यांनी केले. महेश्‍वरा बद्दल अख्यायिका सांगितली जाते की बारामती तालुक्यातील सालपे या गावातून मेंढपाळ भटकंती करत कोळगावथडी गोदावरीच्या तीरावर वसले मेंढराना या ठिकाणी मुबलक चारा पाणी मिळू लागला मात्र हा भाग दलदलीचा असल्याने त्यांनी आपला मुक्काम जवळच असलेल्या खडकाळ माळरानावर हलवला. अज्ञात रोगाने मेंढ्या मृत्यूमुखी पडू लागल्याने मेंढपाळानी एकत्र येत गुढी पाडव्या च्या दिवशी दगड गोट्यास शेंदूर लावून मनोभावे पूजा करत वाडयावर आलेले संकट निवारण करण्याची प्रार्थना केली.  देवाने भाविक मेंढपाळास  स्वप्नात दृष्ठातं देत तळ्या जवळील शेवडिचे पाणी मेंढरास पाजवयास सांगितले या पाण्याने जनावरा बरोबर मानसाचे हि असाध्य रोग बरे होऊ लागल्याने देवाची महती सर्वदुर पोहचुन नवसाला पावनारा महेश्‍वर पंचक्रोशीचे आराध्य दैवत बनले.

COMMENTS