Homeताज्या बातम्या

कनेक्टिंग लिंकवर पुन्हा अपघात

मुंबई : मुंबई-पुणे महामार्गाच्या कनेक्टिंग लिंकवर (मिसिंग लिंक) मुंबईहून पुण्याकडे जाणार्‍या एका कारवर कनेक्टिंग लिंकच्या बोगदा क्रमांक दोनमध्ये

भाजप नेत्याच्या कारच्या धडकेत 2 तरूणींचा मृत्यू
मध्यप्रदेशातील अपघातात 5 युवकांचा मृत्यू
भीषण अपघातात जामखेडच्या दोन तरुणांचा मृत्यूमाहिजळगाव-अहिल्यानगर महामार्गावरील दुर्घटना; एक गंभीर
Two killed, 21 injured in Nepal bus accident; relief announced for victims' families | Akashvani News


मुंबई : मुंबई-पुणे महामार्गाच्या कनेक्टिंग लिंकवर (मिसिंग लिंक) मुंबईहून पुण्याकडे जाणार्‍या एका कारवर कनेक्टिंग लिंकच्या बोगदा क्रमांक दोनमध्ये दोन ते तीन दगड पडले. त्यामुळे कारची पुढची काच फुटली असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणार्‍या चारचाकीच्या पुढच्या काचेवर कनेक्टिंग लिंकमधील बोगदा क्रमांक 2 मध्ये दोन ते तिज दगड पडल्याने कारची समोरील काच फुटली आहे. कारचालक उचप्पा खतनाप्पा वरचल्ली (वय 53, रा. खोपोली, रायगड) यांच्या अंगावर कारच्या फुटलेल्या काचा पडल्या. या प्रकरणी कारचालकाने तक्रार दाखल केली नाही.

COMMENTS