Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात!; तापी येथील एकाच कुटुंबातील ५ जण जखमी!

https://www.youtube.com/watch?v=4eUORGKzHiI समृद्धीमहामार्ग अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. वाशिमच्या कारंजाजवळ पुन्हा एकदा एका भी

गाझीपूरमध्ये ५० प्रवाशांनी भरलेली बस ३० फूट खोल पाण्यात कोसळली; १ जणाचा मृत्यू, २४ जण गंभीर जखमी
पंढरपूरजवळ भाविकांची पिकअप गाडी विहिरीत कोसळून भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू
अहिल्यानगरमध्ये काळाचा घाला! तपोवन रोडवर भरधाव डंपरने वयोवृद्ध महिलेला चिरडले; अपघातात जागीच मृत्यू

समृद्धीमहामार्ग अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. वाशिमच्या कारंजाजवळ पुन्हा एकदा एका भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगात असलेल्या स्कार्पिओचा टायर अचानक फुटल्याने गाडी थेट डिव्हायडरला धडकून पलटी झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जण जखमी झाले आहेत.
ही घटना समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक १६७ वर घडली आहे. मूळचे गुजरातच्या तापी येथील रहिवासी असलेले खान कुटुंब काशी विश्वनाथचे दर्शन घेऊन स्कार्पिओने वापीकडे परतत होते. मात्र, कारंजा परिसरात गाडी आली असता, समोरील टायर अचानक फुटले.
टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी डिव्हायडरला घासून रस्त्यावरच पलटी झाली. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, शोएब खान आणि त्यांच्या पत्नीसह तीन लहान मुले या अपघातात जखमी झाली आहेत.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. सर्व जखमींना तातडीने कारंजा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते.
समृद्धी महामार्गावर प्रवास करताना वाहनांच्या टायरची स्थिती आणि वेग यावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन पुन्हा एकदा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

COMMENTS