थकीत देयकांसाठी ठेकेदारांचे आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

थकीत देयकांसाठी ठेकेदारांचे आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन

अहमदनगर/प्रतिनिधी : ठेकेदारांनी सुरू केलेल्या कामबंद आंदोलनाची मनपा प्रशासनाकडून दखल न घेतल्याने शुक्रवारी ठेकेदरांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांच्या द

नगर अर्बन बँकेची अखेर निवडणूक होणार ; चिन्ह वाटप जाहीर, बँक बचाव पॅनेलचा बिनविरोध सूर बासनात
पोलिस कारवाईनंतरही कोतुळमध्ये मटका सुरूच
बेसुमार पाणी वापरणाऱ्यांनी किमान दहा पट तरी पाणी पट्टी भरावी : वाहडणे

अहमदनगर/प्रतिनिधी : ठेकेदारांनी सुरू केलेल्या कामबंद आंदोलनाची मनपा प्रशासनाकडून दखल न घेतल्याने शुक्रवारी ठेकेदरांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, ठेकेदारांच्या आंदोलनामुळे मनपाची विकासकामे ठप्प झाली आहेत. या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर चार वेळा चर्चा होऊन देखील सुद्धा प्रश्‍न सुटलेला नाही. त्यामुळे हे आंदोलन आगामी काळामध्ये अधिक तीव्र करण्याचा इशारा सुद्धा संघटनेने दिला आहे.
सन 2011 पासूनची थकीत देयके अदा न केल्यामुळे मनपा ठेकेदार संघटनेने 30 नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे तीन दिवसांपासून शहरातील छोटी-मोठी सर्व कामे ठप्प झाली आहेत. या आंदोलनाची दखल घेऊन साधी चर्चाही प्रशासनाने संघटनेबरोबर केली नाही. त्यामुळे ठेकेदारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून ठेकेदारांनी आक्रमक पवित्रा घेत शुक्रवारी सकाळपासून आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. अनेक वर्षापासून शहरातील विकासकामांची कोट्यावधी रुपयांची ठेकेदार संस्थांची देयके मनपा प्रशासनाने थकविली आहेत. सुमारे 35 ते 40 कोटींची देयके थकीत आहेत. त्यामुळे ठेकेदार संस्था अडचणीत आल्या आहेत. ठेकेदारांच्या थकीत देयकांबाबत यापूर्वी अनेकवेळा निवेदने दिलेली आहेत. प्रशासनाने देयके देण्याबाबत आश्‍वासन दिले होते. मात्र, आजतागायत देयके अदा झालेली नाहीत. कामबंद आंदोलन सुरू होऊन चार दिवस लोटले तरी यावर तोडगा निघालेला नाही. दरम्यान, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्यासमोर ठेकेदारांची चर्चाही झाली मात्र ठेकेदारांनी आम्हाला आमची बिल आधी देता का, अशी विचारणा केली व ती दिली नाही तर सोमवारपासून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला.

COMMENTS