Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमली पदार्थांची तस्करी करणारा आरोपी अटकेत

मुंबई ः गोवंडीमधील शिवाजी नगर परिसरात अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या एका सराईत आरोपीला पोलिसांनी अटक केली. या आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी तीन

गडकरींसारख्या निष्ठावंत नेत्याला डावलले
तपोरत्न प्रभु पंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांना वीरशैव समाजाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण..
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेस येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई ः गोवंडीमधील शिवाजी नगर परिसरात अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या एका सराईत आरोपीला पोलिसांनी अटक केली. या आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी तीन लाख रुपये किमतीचे एमडी जप्त केले. शिवाजी नगर पोलीस ठाण्याने गोवंडी परिसरात अंमलीपदार्थविरोधात मोहीम हाती घेतली आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी मेहताब शेख या अमलीपदार्थ तस्करला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून 20 ग्राम एमडी जप्त केले. हे अंमलीपदार्थ जाबीर अन्सारी यांच्याकडून घेल्याचे मेहताबने चौकशीत पोलिसांना सांगितले. त्यानुसार शिवाजी नगर पोलिसांनी अन्सारीचा शोध सुरू केला. अन्सारी 15 मे रोजी शिवाजी नगर परिसरातील बंजारा चाळ येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.

COMMENTS