Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईतील दोन लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध

नामनिर्देशन पत्रे सादर करण्यास सुरुवात

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी मुंबई शहर जिल्ह्यातील ‘30- मुंबई दक्षिण मध्य’ व ‘31- मुंबई दक्षिण’ या दोन्ही मतदारसंघांमध्ये 20 मे 20

BREAKING: देवेंद्र फडणवीसवर गुन्हा दाखल | LokNews24
भाजपकडून मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न ः खा. रजनी पाटील
कोणीही सत्तेत या, पण लवकरात लवकर राज्यातील गोंधळ संपवा | LokNews24

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी मुंबई शहर जिल्ह्यातील ‘30- मुंबई दक्षिण मध्य’ व ‘31- मुंबई दक्षिण’ या दोन्ही मतदारसंघांमध्ये 20 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. शुक्रवार दि. 26 एप्रिल 2024 रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाली असून दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी आजपासून नामनिर्देशन पत्रे सादर करण्यास सुरुवात झाली आहे, असल्याची मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली. लोकसभा निवडणुकीची अधिसूचना ‘30- मुंबई दक्षिण मध्य’ व ‘31- मुंबई दक्षिण’ या दोन्ही मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील सूचना फलक, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय येथील सूचना फलकावरही प्रदर्शित करण्यात आली आहे. 3 मे 2024 पर्यंत सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त कोणत्याही दिवशी सकाळी 11 ते दुपारी 03 वाजेपर्यंत संबंधित निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्रे उमेदवाराला किंवा त्यांच्या कोणत्याही प्रस्तावकाला दाखल करता येईल. ‘30- मुंबई दक्षिण मध्य’ लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, खोली क्रमांक, 205, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई-01 येथे उपरोक्त नमूद कालावधीत मिळू शकतील. तसेच ‘31-मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय, जुने जकात घर, पहिला मजला, कक्ष क्रमांक 132, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई-01 येथे उपरोक्त नमूद कालावधीत मिळू उपरोक्त नमूद कालावधीत मिळू शकतील. 4 मे 2024 रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. 6 मे 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. 4 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे –
निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्दीची तारीख-26 एप्रिल 2024
नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची अंतिम तारीख व वेळ – 3 मे
* नामनिर्देशन पत्राची छाननी तारीख – 04 मे 2024
* उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख व वेळ – 06 मे
* मतदानाची तारीख व वेळ-20 मे 2024, सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत
* मतमोजणीची तारीख – 04 जून 2024
* निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख – 6 जून 2024

COMMENTS