Homeताज्या बातम्या

कोपरगावमधील संघटित गुन्हेगारी आणि चोऱ्यांच्या सत्राला आळा घाला

आमदार विवेक कोल्हे यांच्या पोलीस प्रशासनाला कडक सूचना कोपरगाव : कोपरगाव शहर आणि तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी, चोरी, शेतमाल चोरी तस

समृद्धी महामार्गावर लुटमार करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
कुख्यात घायवळ टोळीचे मोक्कातील फरार आरोपी जेरबंददोघे ताब्यात ; कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे सापळा
राहुरीत ‘मिशन अँटी ड्रोन’ सुरूच; संशयास्पद ड्रोनची संख्या घटली, मात्र गूढ कायम

आमदार विवेक कोल्हे यांच्या पोलीस प्रशासनाला कडक सूचना

कोपरगाव : कोपरगाव शहर आणि तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी, चोरी, शेतमाल चोरी तसेच संघटित गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अनेक भागांमध्ये रात्रीच्या वेळी चोरांचा मुक्त वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला असून पोलिसांनी याकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे आमदार विवेक कोल्हे यांनी म्हटले आहे.

अलीकडेच कोपरगाव शहरातील संयकमनगर आणि गावावरेनगर येथील चोरीच्या घटना गंभीर आहेत. काही दिवसांपूर्वी गांधीनगर परिसरात पहाटेच्या सुमारास चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केला. तसेच तालुक्यात विविध ठिकाणी शेतमाल चोरी आणि इतर गुन्हेगारी प्रकारांच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असल्याने नागरिक व शेतकरी वर्ग कमालीच्या दहशतीखाली आहे.

या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलीस ठाणे व तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या विशेष मोहीम राबवून गुन्हेगारांना तातडीने जेरबंद करावे, अशी आग्रही मागणी आमदार विवेक कोल्हे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे. रात्रीची गस्त वाढवणे, संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती वाढवणे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा माग काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कायद्याचा धाक निर्माण करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष कृती आराखडा राबवून दिलासा द्यावा, असे आवाहन आमदार कोल्हे यांनी केले आहे.

COMMENTS