Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बुलढाण्यात पुन्हा ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात

बुलढाणा प्रतिनिधी - बुलढाणा जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मलकापूर शहरातील हायवे क्रमांक सहा वरती दोन खासगी ट्रॅव्हल्सची समोरासमो

तलवाडा ते गेवराई रोडवर समोरा समोर दूचाकी धडक
नऊ वर्षीय बालकाचा बसच्या धडकेत मृत्यू
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर कारचा टायर फुटून अपघात

बुलढाणा प्रतिनिधी – बुलढाणा जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मलकापूर शहरातील हायवे क्रमांक सहा वरती दोन खासगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेत ६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती आहे. तर २५ ते ३० प्रवासी जखमी झाले आहेत. ही दुर्देवी घटना शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.बुलढाण्यात खासगी बसचा अपघात होण्याची महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली असून खासगी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अमरनाथ येथून ३५ ते ४० प्रवाशांना घेऊन खासगी बस हिंगोलीच्या दिशेने निघाली होती. त्याचवेळी दुसरी बस नागपूरवरून २५ ते ३० प्रवाशांनी घेऊन नाशिकच्या दिशेने येत होती. दरम्यान, दोन्ही बस मलकापूर शहरातून जाणाऱ्या हायवे क्रमांक सहा वरती समोरासमोर धडकल्या. हा अपघात इतका भीषण होता, की दोन्ही ट्रॅव्हल्सचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातत ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन्ही ट्रॅव्हल्स मधील ते २० ते २५ प्रवासी जखमी आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने पोलिसांनी आपल्या वाहनातून जखमींना घेऊन मलकापूर रुग्णालयात दाखल केले. जखमींचा जीव वाचवण्यासाठी पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. दरम्यान, अपघातातील काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बुलढाणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. महिनाभरातच बुलढाणा जिल्ह्यात खासगी बसचा दुसरा भीषण अपघातझाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

COMMENTS