Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवोदय विद्यालयात सहावीच्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लातूर ः येथील जवाहर नवोदय विद्यालयातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून, सहावी इयत्तेत शिकणार्‍या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आह

ओबीसी आरक्षण सरकारकडून कमकुवत केले ः प्रकाश शेंडगे
मा. खा. डॉ. सुनील गायकवाड यांचा क्रांतिकारी धम्मरत्न पुरस्काराने सन्मान
लातूर महापौर निवडणुकीत काँग्रेस-वंचितमध्ये तणाव

लातूर ः येथील जवाहर नवोदय विद्यालयातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून, सहावी इयत्तेत शिकणार्‍या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. मुलींच्या वसतिगृहातील खोलीत तिचा मृतदेह पलंगाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेने संपूर्ण शैक्षणिक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत विद्यार्थिनी अभ्यासात हुशार, शांत स्वभावाची आणि चुणचुणीत असल्याचे शिक्षक व सहाध्यायी सांगत आहेत. त्यामुळे इतक्या लहान वयात तिने टोकाचे पाऊल उचलले असावे, ही बाब अनेकांना धक्का देणारी ठरली आहे. मृत विद्यार्थिनीचे वडील औसा तालुक्यातील टाका गावचे रहिवासी असून, ते मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. प्राथमिक अंदाजानुसार अभ्यासाचा ताण आणि शैक्षणिक दबाव यामुळे ही घटना घडली असावी, असा कयास व्यक्त केला जात आहे. मात्र, नातेवाईकांनी हा मृत्यू आत्महत्येचा नसून घातपाताचा असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. मृत्यूमागचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पोलीस सर्व शक्यता तपासत असून, वसतिगृहातील कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, रुग्णालयात मृत विद्यार्थिनीचे आई-वडील, आजी-आजोबा यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे मन हेलावून गेले. संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, या घटनेने नवोदय विद्यालयातील विद्यार्थी सुरक्षेचा आणि मानसिक आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.

COMMENTS